इतर

उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूरला ५ लाखाचा गोवा बनावटीचा मद्यसाठया सह 10,लाखाचा  मुद्देमाल जप्त

कोल्हापूर : येथील सायबर चौक रोडवर एक व्यक्ती गोवा बनावटीची दारु विकण्यासाठी येणार असल्याची टीप राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाला मिळाली होती. यानुसार ३१ जानेवारी रोजी रात्री उत्पादन शुल्क विभागाने कोल्हापूरच्या हॉकी स्टेडीयम चौक ते सायबर चौक रोडवर सापळा रचत 5,06,400 रुपयाचा गोवा बनावतीचा मद्यसाठा जप्त करत एकूण 10,06,400 रु किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

दरम्यान 1 फेब्रुवारी रोजी पहाटे साडे पाचच्या सुमारास आयसोलेशन हॉस्पीटल समोर एक संशयित चार चाकी घेऊन येत असलेला दिसला. यावेळी पोलिसांनी गाडी थांबवत गाडीची तपासणी केली असता डीग्गीमध्ये लपवलेली गोवा बनावटीचे विदेशी मद्याने भरलेले बॉक्स आढळले. हे कागदी पुठ्याचे 35 बॉक्स मिळुन आले असून या कारवाईत पोलिसांनी चालक डॅरेल फर्नांडीस रा. आजगाव ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग याला अटक केली आहे.

दरम्यान या कारवाईत पोलिसांनी 5,06,400 रुपयाचा मद्यसाठा जप्त केला असून एकुण मुद्देमालाची किंमत 10,06,400 रु होत असल्याची माहिती कोल्हापूर उत्पादन विभागाने दिली आहे.

या कारवाईकरता राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर शहरचे निरीक्षक, रोहिदास वाजे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, श्रीमती सरीता पाटणे व जवान राहूल गुरव, गणेश सानप, पंकज खानविलकर यांनी सहभाग घेतला.टीप 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button