विवाह इच्छुक तरुणांचे आयडॉल राजू काका देशपांडे

दत्ता ठुबे
पारनेर – पारनेर तालुक्यातील व निघोज परिसरातील एकमेव चालते – बोलते मोफत विवाह नोंदणी सेवा केंद्र म्हणून प्रसिद्ध असलेले व पौराहत्य करणारे राजू काका देशपांडे यांनी आज अखेर ५०० विवाह जुळून रेशीमगाठी बांधून दिल्याने ते कौतुकाचा विषय झाले आहेत .
राजू काका देशपांडे यांचा विवाह जुळविण्यात मोठा हातखंडा असून आजच्या या धकाधकीच्या जीवनात विवाह वर तरुणांसाठी विवाह इच्छुक तरुणींची संख्या खूप कमी प्रमाणात असल्याने अनेक तरुण स्वतः चे शुभमंगल होण्यासाठी काहीही करण्यास प्रसंगी कोणतेही धाडस करण्यास तयार होतात . पण तरी ही त्यांचे ते ध्येय साध्य होताना त्यांना अनंत अडचणी येतात . अश्या परिस्थितीत निघोज परिसरात शास्त्रोक्त पद्धतीने धार्मिक कार्य करण्यासाठी प्रसिद्ध असलेले राजू काका देशपांडे यांच्या सारखा अवलिया निराळाच , ते ही हे शुभ कार्य कोणताही मोबादला न घेता , आजच्या या पैश्यांच्या बाजारात विनामुल्य करून दोन तरुण जीवांच्या रेशीम गाठी गठ्ठ बांधून देतात .
राजू काका देशपांडे हे २०१० पासून पारनेर तालुक्यात पौराहित्य करतात , या धार्मिक कार्याबरोबरच त्यांना विवाह जमविण्याचा छंद लागला , पण ते याकडे व्यवसाय म्हणून नव्हे , तर आवड म्हणून त्यांनी आजअखेर १४ वर्षात ५०० पेक्षा ही जास्त विवाह विना मोबादला जमून दिल्याने तरुणांचे त्यांना आयडॉल म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आजच्या या युगात विवाह इच्छुक तरुणीला मोठा पगार , स्वतःचे घर , चार चाकी गाडी आणि शेती अश्या तरुणाचे स्थळ हवे असते . पण अश्या अपेक्षेने विवाह इच्छूक तरुण सहजा सहजी मिळत नाही . यासाठी मध्यस्ती करण्यासाठी माध्यम आवश्यक असते आणि तेच काम निघोज चे राजू काका देशपांडे हे करतात . ते व्यावसायिक , नोकरदार तरुणांबरोबरच शेतकरी तरुण ही कसा योग्य आहे , हे यथा योग्य पटवून देतात . त्यामुळे त्यांनी सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील शेकडो तरुणांचे विवाह जमवून दिल्याने त्यांचे महत्त्व सर्व दूर पसरल्यामुळे अनेक विवाहीत तरुण – तरुणीं चे पालक विवाह जुळविण्यासाठी आवर्जून त्यांना बोलवितात .
लग्न जमविताना ते तरुणांच्या घरच्यांना विवाह समारंभात विनाकारण होणारा अनावश्यक खर्च टाळून कमी खर्चात विवाह करण्याचा सल्ला देतात , शिवाय वरात नको , याबद्दल ते सकारात्मक भूमिका मांडतात . समाजात चांगले विचार , हिंदू संस्कृती आणि धार्मिकता वाढीसाठी राजू काका देशपांडे हे सदैव धडपडत असतात . त्यांची सर्वसामान्य गोरगरीब कुटूंबांना मदत करण्याची सतत मानसिकता असल्याने संपूर्ण पारनेर तालुक्यात त्यांचे नाव आदर पुर्वक घेतले जाते . त्यांच्या या कार्याची दखल घेवून माजी गृहराज्यमंत्री व आमदार राम शिंदे यांच्या हस्ते निघोज मध्ये सन्मान करण्यात आला . तर शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या किलबिल बाल विकास च्या ज्ञानोदय कोचिंग क्लासेस च्या वतीने गौरव करण्यात आला .
धार्मिक शास्त्रोक्त पद्धतीने पुजा विधी व विवाह जमविण्या साठी राजू काका देशपांडे यांच्या शी भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६५२९६८१ यावर संपर्क साधू शकता .