इतर
नेप्ती येथील सुशीला फुले यांचे निधन.

अहिल्यानगर:- नगर तालुक्यातील नेप्ती येथील माळी समाजाच्या सुशीला माधव फुले यांची हदयविकाराच्या झटक्याने वयाच्या ८१ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.
त्या धार्मिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असत गावातील मंदिराच्या जिणोद्धारासाठी त्यांनी अनेक वेळा सरळ हाताने मदत केली. त्यांच्या पश्चात एक मुलगा, चार मुली ,सुना, नातवंडे असा परिवार आहे . सामाजिक कार्यकर्ते दादाभाऊ फुले यांच्या त्या मातोश्री होत्या .त्यांच्या निधनामुळे गावात दुखवटा म्हणून ग्रामस्थांनी व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांचा नेप्ती अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आला. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.