श्री.समर्थ इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये पारितोषिक वितरण समारंभ संपन्न !

परिस्थिती व बुद्धिमत्तेवरून कोणालाही कमी लेखू नका !
पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी
दत्ता ठुबे /पारनेर प्रतिनिधी :
शैक्षणिक क्षेत्रात गुणवत्तेच्या दृष्टिकोनातून सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे व भविष्यातील स्पर्धेच्या युगात विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी इंग्रजी माध्यमात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा हा दृष्टिकोन ठेवून सुरू केलेले श्री समर्थ इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांमध्ये प्रोत्साहन निर्माण करण्यासाठी व त्यांच्या कार्याला व कलागुणांना शबासकी देण्यासाठी पारितोषिक देवून सन्मानित करणे गरजेचे असते .त्यामुळे विद्यार्थ्यांना एक नवीन ऊर्जा मिळते म्हणून या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये दिनांक १३ एप्रिल २०२३ रोजी शाळेच्या भव्य प्रांगणात पारितोषिक वितरण समारंभ विद्यार्थी व पालकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असलेल्या मा.ज्योती गडकरी मॅडम उपस्थित होत्या. तसेच कायझेन अकॅडमीचे संचालक मा. श्री.डाळिंबकर सर आणि कायझेन अकॅडमीचे सहसंचालक मा. श्री.गीते सर हेही उपस्थित होते .
श्री.समर्थ अॅकॅडमीचे संचालक , मा.श्री.कैलासजी गाडीलकर सर, सौ. शिल्पा गाडीलकर मॅडम, बी.एड. कॉलेजच्या प्राचार्य डॉ.सौ.भांबरे मॅडम, श्री. पवार सर, मेहेत्रे मॅडम, स्कूलचे प्राचार्य श्री. देठे सर या वेळी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना विविध स्पर्धेतून वाव देत त्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन दिले जाते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. देठे सर यांनी केले. यावेळी पॉलिटेक्निकचे प्राचार्य श्री.कुलकर्णी सर या प्रसंगी बोलताना म्हणाले की , कोणतेही काम जोपर्यंत आपण मनापासून करत नाही तोपर्यंत ते काम चांगले होत नाही. काम करताना मनापासून करा असा मोलाचा सल्ला देत विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम म्हणाल्या कोणतेही काम करताना प्रॅक्टिकल नॉलेज असले पाहिजे. काम करताना कुठलाही कमीपणा बाळगू नका. घरातील सर्व कामे करता आली पाहिजे. बेसिक नॉलेज असले पाहिजे. आई वडील शिक्षक घरातील प्रौढ व्यक्तीचे ऐकले पाहिजे परिस्थितीवरून व बुद्धिमत्तेवरून कोणालाही कमी लेखू नये असे त्या म्हणाल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दहावीतील विद्यार्थिनी दिव्या आणि समृद्धी यांनी केले तर आभार चिकणे सर यांनी मानले.