राजुर येथे डिजिटल साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न.

अकोले/प्रतिनिधी
येथे डॉ. डी. वाय. पाटील विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालय, आकुर्डी पुणे व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांचे संयुक विद्यामाने अदिवासी विकास प्रकल्प राजुर, अदिवासी विभागातील आश्रम शाळा. व जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक वृंदा साठी डिजिटल (संगणक) साक्षरता प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
अदिवासी विभागातील शिक्षकांची गरज व डिजिटल बोर्ड चे प्रशिक्षण या हेतुने संगणक प्रशिक्षण देण्यात आले. सुमारे १५५ शिक्षक प्रतिनिधी या कार्यशाळा मध्ये सहभागी झाले होते
या परिषदेत प्राधापक आकाश शिखरे व प्रा. संदीप वैद्य यांनी संगणकीय माहिती व डिजिटल बोर्ड यांचे प्रशिक्षण व माहिती देण्यात आली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रकल्प अधिकारी माः देवकण्या बोकडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोहन वामन सह अधिकारी उपस्थित होते.
या. कार्यशाळेचे आयोजन डॉ. डी. वाय पाटील युनिटक सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्ष डॉ. भाग्यश्री ताई पाटील सचिव डॉ सोमनाथ पी.पाटील, प्राचार्य प्राचार्य डॉ रनजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले
