इतर

अपंग व दिव्यांग बांधवांसाठी ३ हजार रुपये पेन्शन करावी !

आमदार निलेश लंकेंची विधानसभेत लक्षवेधी !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून अपंग व दिव्यांगांना १ हजार रुपये अनुदान सध्या शासनाच्या वतीने देण्यात येत आहे परंतु या अनुदानात वाढ करून ३ हजार रुपये करावे अशी लक्षवेधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे.तर शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांग निधीचे समान वाटप करावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी केली आहे.
दिव्यांग कल्याण विभागाकडे महाराष्ट्र शासनाचे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष झाले असून राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी यासंबंधी लक्षवेधी केली आहे. आपण देशामध्ये राज्यामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करता असताना दुसरीकडे दिवंग्याच्या ज्या महत्त्वपूर्ण मागणी आहे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके म्हणाले. दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी आपल्या पायावर उभे करण्यासाठी तालुका अपंग पुनर्वसन केंद्र उभे करावे अशी मागणी आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत केली आहे. तर दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेतून अपंगांना व दिव्यांग बांधवांसाठी १ हजार रुपये पेन्शन दरमहा देण्यात येते ती ३ हजार रुपये करावे अशी मागणी पण विधानसभेत आमदार लंके यांनी केली आहे. महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत व ग्रामपंचायत मध्ये त्यांच्या उत्पन्नाचा पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांसाठी खर्च केला जातो. मेट्रो सिटी मध्ये दिव्यांग बांधवांना दोन ते तीन हजार रुपये महिना दिला जातो तोच निधी ग्रामीण भागात वर्षाला २०० ते ३०० रुपये मिळतो त्यामुळे हा सर्व निधी एकत्र करून शहरी व ग्रामीण भागातील दिव्यांगांना या निधीचे समान वाटप करावे अशी मागणी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी केली आहे. दिव्यांगांचे २१ प्रकार असून त्याप्रमाणे त्यांना सोयी सुविधा मिळत नाही आजही अनेक आदिवासी दुर्गम भागात राहत असल्याने अपंग प्रमाणपत्र पासून वंचित आहे त्यामुळे या अपंग बांधवांना प्रमाणपत्र मिळण्यासाठी दरवर्षी तालुका विशेष शिबिर घेण्याची मागणी आमदार लंके यांनी विधानसभेत केली आहे. तर दुसरीकडे या अपंग बांधवांना हरित ऊर्जेवर चालणारी वाहने सबसिडीवर देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे त्यामुळे रोजगार निर्मिती होईल असेही आमदार लंके म्हणाले.तर ज्या सामाजिक संस्था दिव्यांग बांधवा रोजगारासाठी काम करतात त्या संस्थांना मशनरी साठी व जागेसाठी शासनाकडून अनुदान मिळावे या माध्यमातून कुशल कामगार तयार होतील. महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीमध्ये दिवंगाच्या ज्या राखीव जागा आहे त्या अद्याप पर्यंत भरलेल्या नाही त्या जागा तातडीने भरावे असे मागणी पण आमदार निलेश लंके यांनी विधानसभेत केले आहे.

अपंग बांधवांसाठी दिव्यांग विमा योजना चालू करावी आमदार निलेश लंके
दुसरीकडे दिव्यांग व्यक्ती ही आजारी व्यक्ती असल्याने शासनाने दिव्यांग विमा योजना चालू करावी त्यामुळे या दिव्यांग बांधवांना चांगल्या रुग्णालयात उपचार घेता येईल. दिव्यांग बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रतिनिधी म्हणून या दिवंगांना आरक्षण द्यावे अशी मागणी पण विधानसभेत आमदार लंके यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button