सूर्य सप्तमी औचित्य साधून फलदान व दूध वाटप

राधिका फाउंडेशन चा उपक्रम
नाशिक / प्रतिनिधी
डॉ शाम जाधव
आज दिनांक ४/२/२०२५ रोजी राधिका फाउंडेशन हे नेहमीच सामाजिक, शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रात काम करत असते सणवारा प्रमाणे ज्या ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीला परंपरागत करत आलो आहोत याचच औचित्य साधत आज सुर्य सप्तमी निमित्ताने पंचवटी येथील पुरातन सूर्यमंदिर येथे राधिका फाऊंडेशन कडुन पूजा आरती करण्यात आली.
आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रतिक शुक्ल यांचा सत्कार
राजेंद्र बाफना यांनी केला, त्यानंतर परिसरातील सर्व भाविकांना दूध, राजगिरा लाडू, केळी वाटप करण्यात आली.
याप्रसंगी संस्थापिका डॉ.चेतनाताई सेवक, उपाध्यक्ष वदंना बनकर, म.बाद अध्यक्ष, संदीप काकड, खजिनदार अनिल नहार, कार्यध्यक्ष महेंद्र आहेर, विकि कुटे, राजेंद्र बाफना, ललित चोरडिया संगीता बाफना, बबिता शर्मा, उमा परदेशी, प्रिया भारते, पौर्णिमा बेलेकर, संगीता जाधव, ज्योती जोशी, रेखा काकड राधिका मराठे, सुरेखा कोरडे,आणि सर्व सदस्य उपस्थित होते.
