इतर

सौ अनिताताई जगताप यांचा शिर्डीत अनोखा हळदी कुंकू समारंभ संपन्न………

शिर्डी प्रतिनिधी

(संजय महाजन)

शिर्डी शहराच्या माजी नगराध्यक्षा तसेच शिर्डी लोकसभा मतदारसंघच्या शिवसेना पक्षाच्या सह संपर्कप्रमुख सौ अनिताताई जगताप ह्या सलग 24 वर्षापासुन अविरत शहरातील महिलांसाठी हळदी कुंकू सोहळा साजरा करीत आहेत.
ह्या वर्षीसुद्धा त्यांनी व्यापक स्वरुपात हळदी कुंकू सोहळा साजरा केला. साधारणपणे 1100 महिलांना हळदी कुंकू व वाण देऊन आनंद साजरा करण्यात आला.
शहराच्या विविध भागातून आलेल्या सर्व जाती धर्माच्या सुवासिनीना सौभाग्याचे लेणे देत असतांना आपणांस खुप आनंद होत आहे व आपण सर्व सुवासिनी व माता भगिनींच्या आशीर्वादानेच असे सोहळे पार पडत आहेत.
ह्यावर्षी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडीलकर साहेबांच्या सुविद्य पत्नी सौ वंदनाताई गाडीलकर तसेच संस्थानच्या प्रशासकीय अधिकारी सौ प्रज्ञाताई महांडुळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते पैठणीचे लकी ड्रॉ काढण्यात आले. तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना विशेष पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
आपल्या नगराध्यक्षा कार्यकाळात सौ अनिताताई यांनी सलग तीन वर्षे संपूर्ण शहरासाठी शिर्डी नगरपंचायत मार्फत भव्य हळदी कुंकू समारंभ पार पाडले. देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत योजने अंतर्गत महाराष्ट्र शासनाचा नगराध्यक्षा सौ जगताप यांना स्वच्छता व सुरक्षित शहराचा प्रथम पुरस्कार सर्वात प्रथम मा.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्या वर्षी स्वच्छतेचा मंत्र नजरेसमोर ठेऊन महिलांना वाण म्हणुन डस्टबिनचे वाटप करण्यात आले होते.
त्यानंतरच्या काळातील कोणत्याही नगराध्यक्षांनी किंवा पदाधिकाऱ्यांनी ही प्रथा सुरू ठेवली नाही. त्याकाळात महिलां साठी विविध उपक्रम राबवून समाज प्रबोधन घडवून आणले.
प्रशासकीय सर्व यंत्रणांचा योग्य समन्वय साधून शिर्डी भयमुक्त , स्वच्छ व सुरक्षित करण्याचे काम सौ जगताप यांनी केले. आज सारखी परिस्थिती त्या काळात नव्हती. आज महिला विद्यार्थिनींना असुरक्षित असल्याची भावना त्यांच्या मनात आहे. शिर्डी शहराचे सुरक्षेविषयी पोलिसांतर्फे लवकरात लवकर योग्य ती कारवाई केली गेली नाही तर आंदोलनास सामोरे जावे लागेल असा इशारा त्यांनी दिला.
परिसरातील महिलांना एकत्र करून विचारांच्या देवाण घेवाण सोबत सांस्कृतिक प्रथांचा योग्य वापर प्रबोधनासाठी केला आहे गेला. उखान्याची स्पर्धा भरवून लोप पावत चाललेली सांस्कृतिक प्रथेचे पुनरुज्जीवन देण्याचे काम सौ जगताप करीत आहेत.
उपस्थित महिलांना कार्यक्रमादरम्यान भजन,गाणी तसेच विनोद या सोबत खमंग अल्पोपाहाराची व्यवस्था अग्रगण्य असे छत्रपती मित्र मंडळामार्फत करण्यात आली होती.
पूर्ण वर्षभर प्रत्येक सणवार जसे श्री गणेशोत्सव छत्रपती श्री शिवजयंती असे एक ना अनेक कार्यक्रम सौ अनिताताई व श्री विजयराव जगताप पा.यांचे मार्फत साजरे होत असतात. आगामी काळातही अशा सर्व कार्यक्रमांचा वारसा त्यांच्या सूनबाई सौ स्वातीताई व चिरंजीव श्री करण जगताप पाटील हे असेच सुरू ठेवतील हे त्यांच्या कार्यक्रमाच्या उत्कृष्ठ नियोजन व सहभागवरुन निश्चित झाले आहे. सौ स्वातीताई व श्री करणदादा यांनी उपस्थित मान्यवर व महिलांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button