अकोल्यातील शेतकऱ्यांची आर्थिक लूट, महसूल विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा!

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांकडून सेतू चालक मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट करत असल्याचा आरोप आरपीआयचे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
महसूल विभागाने तातडीने यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांनाची आर्थिक पिळवणूक थांबवावी तसे न केल्यास महसूल विभागा विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा श्री विजय पवार यांनी दिला आहे
शेतकऱ्यांच्या विविध योजना ऑनलाईन केल्या जात आहे महाराष्ट्र शासनाने सातबारा उताऱ्याला आधार कार्ड, मोबाईल नंबर संलग्न करून शेतकरी आयडी तयार करण्याचे काम सुरू केले आहे अॅग्रीस्टॅक च्या नावाने सुरू असलेले हे काम सेतू चालक करत आहे मात्र हे कार्ड निशुल्क असताना ही सेतुचालक शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ५०ते १०० रुपये वसूल सक्तीने वसूल करत आहेत या वसुलीला महसूल खात्याचा आशीर्वाद असल्याचे बोलले जात असून महसूल खात्याकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही आदिवासी शेतकऱ्यांची यामुळे मोठ्या प्रमाणावर आर्थिक लूट होत असल्याची समोर आली आहे शेतकऱ्यांची सेतू चालकांकडून होणारी आर्थिक लूट त्वरित न थांबवल्यास अकोले महसूल विभागाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अकोले तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे
अकोले तालुक्यातील वेगवेगळ्या दाखले कागदपत्रांसाठी सेतू चालक मनमानीप्रमाणे फी आकारात असून याकडे देखील महसूल प्रशासनाची दुर्लक्ष आहे पावती न देता सेतू चालक मनमानीप्रमाणे नागरिकांची आर्थिक लूट करत आहेत प्रत्येक सेतू कार्यालयात सेतू कार्यालयातून मिळणाऱ्या कागदपत्रांसाठी द्यावी लागणाऱ्या फी चे फलक दर्शनी भागात लावण्यात यावा अशी मागणी केली आहे
अॅग्रीस्टॅक अंतर्गत शेतकऱ्यांचा सातबारा आधारला लिंक केला जातो जेणेकरून शेतकऱ्याला एक फार्मर आयडी मिळेल. पिक विमा, पीक कर्ज. पीएम किसान व विविध पिक अनुदान यांचा लाभ मिळविण्यासाठी फार्मर आयडी महत्त्वाचा आहे. फार्मर आयडी काढण्याचे कामाचे मानधन शासना कडून सेतू चालकांना दिले जाते कोणत्याही शेतकऱ्याने या कामासाठी सेतू चालकांकना पैसे देऊन नये तसे पैसे मागितले तर महसूल च्या वरिष्ठ कार्यालयाकडेकिंवा माझे कडे ( +91 96043 24600) शेतकऱ्यांनी तक्रार करावी असे आवाहन विजय पवार यांनी केले आहे