महाविद्यालयातूनच कौशल्याचे धडे मिळतात-अभिनेत्री अर्चना महादेव

दत्ता ठुबे
पारनेर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविदयालयातूनच कौशल्याचे धडे मिळतात , माझे ही शिक्षण ही जामगाव सारख्या खेडेगावातूनच झालेले असल्याने प्रतिपादन प्रसिद्ध सिने अभिनेत्री अर्चना महादेव यांनी केले .
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या निघोज येथील श्री मुलिकादेवी महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. विविध गुणदर्शन व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावरून बोलताना प्रसिद्ध सिने अभिनेत्री अर्चना महादेव म्हणाल्या पुढे म्हणाल्या की,विद्यार्थी दशेत शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धेत भाग घेतल्यानंतर आपल्यात अनेक गुण अवगत होत असतात. वकृत्व स्पर्धा, वाद विवाद स्पर्धा, नृत्य स्पर्धा, काव्य स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा, नाट्य स्पर्धा आदी स्पर्धेमधून वाचन लेखन व बोलणे सुधारते. आपल्याला नेमकी कोणते कौशल्य अधिक चांगल्या पद्धतीने अवगत आहे हे त्याच वेळी ओळखता येते. शाळा महाविद्यालयांमधून विविध स्पर्धांमध्ये जी संधी मिळते , त्यामध्येच विद्यार्थ्यांचे भविष्य दडलेले असते. मला देखील अभिनयाचे क्षेत्र महाविद्यालयात मिळालेल्या संधीमुळेच प्राप्त झाले. मुलींनी समाज काय म्हणेल,नातेवाईक काय म्हणतील,याचा विचार बाजूला ठेवून आपले ध्येय ठरवावे व आपण निवडलेल्या क्षेत्रात पूर्ण योगदान देण्याचे प्रयत्न करावे असे प्रतिपादन त्यांनी केले.
संमेलनाच्या कार्यक्रम प्रसंगी श्री ढोकेश्वर महाविद्यालय टाकळी ढोकेश्वर येथील ज्येष्ठ प्रा. वीरेंद्र धनशेट्टी सर यांनी आपल्या मार्गदर्शनामधून संस्थेचा व महाविद्यालयाचा अनुबंध सांगितला.
अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी महाविद्यालयाची गेल्या दहा वर्षाची उपक्रमांची भरारी, महाविद्यालयाने मिळविलेली नवीन कोर्स, अनुदान, नवीन शाखा, स्वच्छ व सुंदर महाविद्यालय म्हणून परिसरात महाविद्यालयाचा नावलौकिक झालेला आहे . या निमित्ताने इतर महाविद्यालय आमच्या महाविद्यालयास भेट देण्यासाठी एकदिवसीय सहल घेऊन येत असतात. संस्थेने महाविद्यालय सुरू केले , म्हणून आज मुली उच्च शिक्षणामध्ये चांगल्या शिकू लागले आहेत. संस्थेची ही यशस्वी वाटचाल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी यशस्वी होऊन पूर्ण करून दाखवलेली आहे असे यावेळी त्यांनी अधोरेखित केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य सुरेश खोसे पाटील , राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे, दैनिक पारनेर समर्थ च्या कार्यकारी संपादिका सौ.निलम खोसे पाटील , माजी प्राचार्य रामचंद्र सुपेकर , पत्रकार अनिल चौधरी, पत्रकार दिपक वरखडे , विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे परीक्षण करण्यासाठी अळकुटी महाविद्यालयाचे प्रा. विशाल रोकडे, प्रा. पोपट सुंबरे, डॉ. प्रवीण जाधव आणि इतर मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रम प्रसंगी गतवर्षीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन प्रमुख मान्यवरांच्य हस्ते गौरव करण्यात आला.
सहकार्याध्यक्ष, प्रा. सचिन निघुट, सांस्कृतिक अधिकारी, प्रा. अश्विनी सुपेकर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.मनोहर एरंडे यांनी केले. मुख्य कार्यक्रम व समारोप या सत्राचे सूत्रसंचालन प्रा.आनंद पाटेकर, डॉ. मनीषा गाडीलकर, प्रा. नीलिमा घुले, प्रा. संगीता मांडगे यांनी केले. तर आभार कार्यक्रमाच्या कार्याध्यक्ष, डॉ. दुर्गा रायकर यांनी मानले. स्नेहसंमेलन कार्यक्रमासाठी समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, प्राध्यापक, आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेह संमेलनात विविध संगीतद्वारे गीते , नकला , सामाजिक संदेशाद्वारे सादर करून उपस्थितांचे मनोरंजन करून कार्यक्रमाला शोभा आणल्याने सर्वांनी आनंदाने कार्यक्रमात सहभाग नोंदवला .