इतर

अगस्ती महाविद्यालयात ‘ वाचन संकल्प महाराष्ट्राचा ‘ उपक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन .


अकोले :प्रतिनिधी

महाराष्ट्र शासन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार अकोले येथील अगस्ती महाविद्यालयात १ ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम आणि ग्रंथ प्रदर्शनासह विविध उपक्रमांतर्गत भरगच्च कार्यक्रम पंधरवडा आयोजित केला असल्याची माहिती प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांनी दिली .

ग्रंथ प्रदर्शनासह आवडीच्या पुस्तकावर परीक्षण – निबंध लेखन , कथन अहवाल , सामुहिक वाचन , वाचन रँली , घोषवाक्य ( स्लोगन ) स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .

याशिवाय दि . 3 जानेवारी रोजी महाराष्ट्रातील विख्यात रानकवी तुकाराम धांडे यांचे ' कविता वाचन सादरीकरणातून वाचन संस्कृती ' तसेच 4 जानेवारी रोजी समीक्षक - संशोधक , साहित्यिक डॉ . सुनील शिंदे यांचे ' वाचन कौशल्य ' , 6 जानेवारी रोजी समीक्षक - साहित्यिक डॉ . अनिल सहस्रबुद्धे यांचे ' वाचन संस्कृतीचा विकास ' आणि 7 जानेवारी रोजी साहित्यिक प्राचार्य डॉ . भास्कर शेळके यांचे ' नवसाहित्याची ओळख ' अशा वैविध्यपूर्ण विषयांवर मान्यवरांची व्याख्याने - परिसंवाद होणार आहेत . 

वाचनसंकल्प महाराष्ट्राचा या महाराष्ट्र शासन तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त उपक्रमाची आणि ग्रंथ प्रदर्शनाची , व्याख्यानांची एकप्रकारे अभिनव पर्वणी साधली जाणार आहे अशी भावना यानिमित्ताने अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या विश्वस्त , पदाधिकारी – व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे .
———————————————–
📚📚

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button