इतर

समाजाच्या विकासासाठी समर्पित भावनेने झटणारा कार्यकर्ता अशी ओळख स्व. मिनानाथ पांडे यांनी निर्माण केली – बाळासाहेब थोरात ‘

अकोले / प्रतिनिधी

– निळवंडे धरणाचे पुनर्वसनासह अकोले तालुक्यातील शेती, शिक्षण, सहकार आणि पाटपाण्याच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ज्येष्ठ नेते दिवंगत मधुकरराव पिचड आणि माझ्या खांद्याला खांदा लावून मीनानाथ पांडे यांनी केलेले काम मोलाचे केले. तालुक्याच्या प्रश्नासाठी सातत्याने काम करताना त्यांना अनेकांनी बघितले आहे. समाजाच्या विकासासाठी समर्पित भावनेने झटणारा अशी त्यांची ओळख होती. ‘कार्यकर्ता’ या शब्दाची व्याख्या करायची तर मीनानाथ पांडे नाव समोर ठेवून करायला लागेल. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न पोटतिडकीने मांडून ते मार्गी लावन्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कदापि विसरता येणार नाही. खऱ्या अर्थाने ते समाजसेवक होते अशा शब्दात राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वर्गीय मीनानाथ पांडे यांच्या कारकिर्दीचा गौरवपूर्ण उल्लेख करत आठवणींना उजाळा दिला.
अकोले तालुक्यातील पाटपाण्याचे अभ्यासक, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे यांच्या जीवनावर आधारित सेवानिवृत्त शिक्षक सुरेश खांडगे यांनी संपादित केलेल्या “ध्यासपर्व”या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा आज कुंभेफळ येथे पार पडला.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून थोरात बोलत होते.
स्वर्गीय मिनानाथ पांडे यांच्या अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला.
समाजात एकरूप होणे म्हणजे काय याचे मूर्तिमंत उदाहरण हे मिनानाथ पांडे होते. मिनानाथ पांडे स्व. भाऊसाहेब थोरात यांचे लाडके कार्यकर्ते होते. दादांचा विश्वास संपादन करणे हे मोठ्या अवघड काम पांडे यांनी केले. एक निस्पृह कार्यकर्ता म्हणून पांडे यांचा उल्लेख करावा लागेल. समाजासाठी वेळ देणे, प्रश्न सोडून घेणे हे काम त्यांनी अविरतपणे केले.


आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले स्व.मिनानाथ पांडे यांनी अकोले तालुक्यातील जलसंधारण, शैक्षणिक व प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी केलेले काम तालुका कदापिही विसरू शकणार नाही. मी तर राजकारणात 2000 सालापासून आलो परंतु त्यापूर्वी अकोले तालुक्यात झालेल्या अनेक चळवळी,घटना, घडामोडी यांचा ध्यासपर्व मध्ये समावेश असल्याने हा ग्रंथ नवीन पिढीला आदर्शव्रत ठरेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


स्वर्गीय मधुकरराव पिचड, स्व.अशोकराव भांगरे, स्व.शांताराम वाळुंज, स्व.विठ्ठलराव चासकर, स्व.मिनानाथ पांडे यांचेसारखे अनेक नेते निघून गेल्याने अकोले तालुक्याच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाल्याचे अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर यांनी सांगितले.
स्वर्गीय पांडे यांचे व माझे बंधूव्रत प्रेम होते. प्रचंड विद्वत्ता बुद्धिमत्ता यांचे जोरावर सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले असल्याचे जिल्हा बँकेचे संचालक मधुकरराव नवले यांनी सांगितले.

यावेळी अगस्ती कारखान्याचे अध्यक्ष सिताराम पाटील गायकर,जेष्ठ नेते मधुकरराव नवले, कॉम्रेड कारभारी उगले, आरपीआयचे नेते विजयराव वाकचौरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जालिंदर वाकचौरे, अगस्ती कारखान्याच्या उपाध्यक्ष सुनीताताई भांगरे,जलसंपदाचे कार्यकारी अभियंता इंजिनीयर किरण देशमुख, शिवसेनेचे तालुकाप्रमुख मच्छिंद्र धुमाळ, अकोलेचे माजी सरपंच संपतराव नाईकवाडी, ज्येष्ठ साहित्यिक शांताराम गजे, शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी, भाऊसाहेब चासकर, शेषनारायण दूध संस्थेचे माजी चेअरमन राधाकिसन कोटकर, माजी सरपंच सखाराम पांडे,प्रियंका पांडे आदींनी स्वर्गीय मीनानाथ पांडे यांच्या कार्यकर्तृत्व प्रकाशझोत टाकणारी मनोगते व्यक्त केली.


प्रास्ताविक व स्वागत ॲड. वसंतराव मनकर यांनी केले. सूत्रसंचालन सेवानिवृत्त तहसीलदार अनिल सोमणी व पत्रकार अमोल वैद्य यांनी केले. आभार गुरव समाज संघटनेचे नेते वसंतराव बंदावणे यांनी मानले.


या कार्यक्रमास योगी केशव बाबा, ह भ प विवेक महाराज केदार, ह भ प दीपक महाराज देशमुख, ह भ प अरुण महाराज शिर्के, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड .माधवराव कानवडे, जिल्हा परिषदेच्या अर्थ बांधकाम समितीचे माजी सभापती कैलासराव वाकचौरे, अकोले तालुका एज्युकेशन संस्थेचे कायम विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष इंजिनिअर सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, ॲड. के.बी.हांडे, प्राध्यापक बबनराव महाले, ज्येष्ठ नेते दादापाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुरेश गडाख,विनय सावंत,श्रीमती अरुणा पांडे श्रीमती मंदाताई नवले, सौ नीता आवारी,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button