साक्री तालुक्यातील विरखेलच्या हर्षल भदाणेंची महसूल सहायक पदी निवड

(संजय महाजन)
: साक्री तालुक्यातील विरखेल येथील हर्षल (राहूल) नानासाहेब भदाणे या तरूणाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करीत त्याची महसूल सहायक या पदावर निवड झाली आहे.
राहूल यास हे ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम व अभ्यासाचे योग्य नियोजन तसेच आई- वडिलांचे स्वप्न साकारण्याची मनातली जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.अखेर राहूलने यशाला गवसणी घालून आई वडिलांचे स्वप्न साकार केले.शासकीय आश्रमशाळेचे सेवानिवृत्त माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक नानाभाऊ जिभाऊ भदाणे व सुनीता भदाणे यांचा राहूल भदाणे हा मुलगा आहे.
राहूल भदाणे हा सध्या पालघर जि. प.च्या वसई पंचायत समितीत बांधकाम विभागात वरिष्ठ लिपीक म्हणून कार्यरत आहे. याआधी जि.प.च्या आरोग्य व ग्रामपंचायत विभागाच्या सहाय्यक पदाच्या स्पर्धा परीक्षेत ही त्याने यश प्राप्त केले होते. त्याच्या ह्या यशाबद्दल विरखेल ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, तसेच मंगलमूर्ती नगरातील नागरीक, शिक्षक, आदींनी कौतुक केले आहे.राहूल याने यावेळी बोलताना सांगितले की, लोकसेवक म्हणून लोकसेवा करण्याची ही संधी मिळाली असल्याचा आनंद मिळला आहे. आई वडिलांचे हे स्वप्न पूर्ण करता आले. ही माझ्यासाठी उपलब्ध असल्याचे ही सांगितले .