नव्या सरकार कडून वीज कंत्राटी कांमगारांच्या प्रलंबित मागण्या बाबत सकारात्मक निर्णय व्हावे!
19% पगारवाढीबाबत च्या चुकीची परिपत्रकांची दुरुस्ती करून नवीन परिपत्रके काढावी
पुणे प्रतिनिधी
तीनही वीज कंपनीतील अधिकाऱ्यांनी कामगार हितार्थ काही चांगली परिपत्रके काढली मात्र
वीज कंत्राटी कामगारांच्या 19% पगारवाढीबाबत शासनाने जाणीपूरक जी चुकीची परिपत्रके काढली याची चौकशी करून या परिपत्रकात दुरुस्ती करून नवीन परिपत्रके काढावी अशी पहिली सूचना नव्या सरकारकडे करणार असल्याचे महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ अध्यक्ष निलेश खरात सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाच्या आंदोलनाची दखल घेत .ना उर्जामंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी निवडणुकी पूर्वी बैठक घेऊन संघटनेला खूप सहकार्य केले त्यांनी अनेक समस्यांवर तोडगे काढले
नव्याने महायुती सरकार संपूर्ण बहुमताने आले त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत नवीन ऊर्जामंत्री व कामगार मंत्री हे आगामी काळात संघटनेला सकारात्मक सहकार्य करतील व कामगारांच्या प्रलंबित समस्यांवर निश्चितच तोडगा काढतील असा विश्वास महामंत्री सचिन मेंगाळे संघटनेने, निलेश खरात यांनी व्यक्त केला आहे