नूतन कला महाविद्यालयात निर्भय कन्या अभियान कार्यशाळा संपन्न….

संगमनेर- ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी निर्भय बनावे, येणाऱ्या संकटांचा सामना करता यावा यासाठी सक्षम असावे. ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन ब्लॅक बेल्ट कराटे श्री ओंकार गोसावी यांनी निर्भय कन्या अभियान आयोजित कार्यशाळेत आपले मत व्यक्त केले.
दिनांक 17 फेब्रुवारी 2025 रोजी विद्यार्थी विकास मंडळ आयोजित निर्भय कन्या अभियान कार्यशाळेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे संलग्न नूतन कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजापूर व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियान योजनेअंतर्गत व्याख्यानमाला व कराटे प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी विद्यार्थ्यांना निर्भय कन्या अभियान योजनेचा उद्देश आणि गरज विविध दाखले देऊन विषद केली.

विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील विविध उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. सुभाष वरपे हे होते. कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या सत्काराचे नियोजन परीक्षा विभाग प्रमुख डॉ. संगीता जांगिड यांनी केले. मा. भाऊसाहेब हासे यांनी आपल्या व्याख्यानात सरकार मुलींच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी प्रा. अमोल खरात प्रा. प्रतीक्षा खतोडे यांनी मनोगत व्यक्त केले.
महाविद्यालयीन तरुण तरुणींमध्ये वाढती गुन्हेगारी पाहता श्री ओंकार गोसावी,श्री मल्हारी चोरमले,सार्थक लांडगे यांनी विद्यार्थींनिसाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण दिले. कार्यक्रमाचे नियोजन विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.प्रविण आहेर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी क्रीडा प्रशिक्षक प्रा. प्रवीण गुंजाळ, एन.एस.एस. समन्वयक प्रा. ओंकार थोरात, IQAC समन्वयक प्रा. सचिन वाकचौरे यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन प्रा. आकांक्षा दारोळे तर आभार प्रा. जाधव मॅडम यांनी मानले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.