आमदार डॉ. किरण लहामटे म्हणाले मी वडिलांचे ऐकले नाही…… आणि आमदार झालो !

भाऊ दाजी पाटील देशमुख परिवाराने मुळा परिसरातील शिक्षणाची उणीव भरून काढली- सीताराम गायकर
–
कोतुळ पब्लिक स्कूल आणि जुनियर कॉलेज कोतुळ चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ
कोतुळ प्रतिनिधी
मुळा नदी ही माझी आई आहे प्रवरा नदी ही मावशी आहे तर आढळा ही दुसरी मावशी आहे मुळा प्रवरात मी वाढलो आणि आढळात माझे सवंगडी वाढलेअसे आमदार डॉ किरण लहामटे म्हणाले
स्वर्गीय भाऊ दाजी पाटील प्रतिष्ठान संचलित कोतुळ पब्लिक स्कूल आणि जुनियर कॉलेज कोतुळ चा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी ते कार्यक्रमात बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊ दाजी पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष व अगस्तीचे माजी संचालक बाळासाहेब देशमुख होते
सोळा वर्षांपूर्वी कोतुळ येथे कृषी विद्यालय आणि नर्सिंग कॉलेज उभे राहिल असे स्वप्न हे कोणी पाहिले नव्हते अकोले तालुक्यात डी एड कॉलेज सुरू झाले
ते पहिले कोतूळ येथे झाले. देशमुख परिवाराने या ठिकाणी शैक्षणिक संस्था सुरू केली आज त्याचे वटवृक्षात रूपांतर झाले ही मुळा विभागाची नव्हे तर तालुक्याच्या भूषणाची बाब आहे

मी वैद्यकीय व्यवसायची प्रॅक्टिस करत असताना त्यावेळी मला सॅनिटरी इन्स्पेक्टर चा कॉल आला होता वडिलांनी सांगितले तू येथे थांबू नको नोकरी कर असे सांगितले होते पण मी ऐकले नाही नोकरी केली नाही येथेच थांबलो माझ्या नशिबात आमदार होणे होते म्हणून मी आमदार झालो याची त्यांनी आठवण करून दिली
डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा लाभलेल्या स्व. भाऊ दाजी पाटील देशमुख परिवारा कडून ज्ञानदानासारखे पवित्र कार्य होत असल्याचे कौतुक त्यांनी केले
सीताराम पाटील गायकर यावेळी म्हणाले की भाऊ दाजी पाटलांचे एक आगळे वेगळे कुटुंब आहे या परिवाराने मुळा परिसरात इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देण्याचे चांगले काम केले परिसरातील शिक्षणाची उणीव भरून काढली यावेळी भाऊ दाजी पाटील यांच्या काळातील लोकल बोर्डाच्या आठवणी ना उजाळा दिला
मी पदवीधर नसलो तरी ग्रामीण भागातून शिक्षण घेतले त्यावेळी मॉडन हायस्कूलमध्ये पाचवीला असताना क्रीडा अनेक पारितोषिक मिळविली

आम्ही विद्यार्थी दशेत खेड्यातून शहरातील शाळेत कसे शिकलो, क्रीडा क्षेत्रातील बक्षीस कशी मिळवली आणि त्याचा आम्हाला कसा आनंद झाला . आपल्या शालेय जीवनातील अनुभव गायकर यांनी सांगितले
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सिताराम पाटील गायकर आमदार डॉक्टर किरण लहामटे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यकारणी सदस्य सचिन नरवडे ,अगस्तीचे संचालक मनोज देशमुख, कृषीभूषण सयाजीरावपोखरकर ,संस्थेचे विश्वस्त राजेंद्र पाटील देशमुख, सुरेश पाटील देशमुख, संस्थेचे संस्थापक रवींद्र देशमुख ,ईश्वर ठाकरे, शिल्पा देशमुख,अरविंद देशमुख, शिवाजीराव देशमुख, फारुख पठाण ,दत्ता कोते ,सुनील गीते, आनंद देशमुख, प्रवीण देशमुख, बबलू सुरेश पाटील देशमुख, श्री राजेंद्र पोखरकर, आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी आमदार डॉ किरण लहामटे , अगस्ती कारखान्याचे संचालक चेअरमन सिताराम पाटील गायकर आदींच्या हस्ते कोतुळ पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेज मधील गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले
.प्रास्ताविक भाषणात संस्थेचे संस्थापक रवींद्र देशमुख व विश्वस्त राजेंद्र पाटील देशमुख यांनी कोतुळ पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या उभारणी व वाटचालीतील यशस्वी टप्पे तसेच विद्यालयात सुरु असलेल्या उपक्रमांची माहीती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन , प्रा. मच्छिंद्र देशमुख ,दत्तात्रय वाळकोळी यांनी केले . यावेळी विद्यार्थ्यांचा बहारदार विविध सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला