सदस्यता नोंदणी अभियानात शिर्डी विधानसभा मतदार संघाची सर्वाधिक नोंदणी

शिर्डी- संघटन पर्व सदस्यता नोंदणी अभियानात शिर्डी विधानसभा मतदारसंघाची उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक नोंदणी झाल्याबद्दल मतदार संघातील प्रतिनिधि म्हणून सन्मान.झाला
भाजपाच्या संघटन पर्वा मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघात सर्वात जास्त भाजपा सदस्य नोंदणी करून उत्तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल नाशिक येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन महाराष्ट्राचे भाजपा कार्याध्यक्ष श्री रवींद्र चव्हाण व महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब खासदार सुजय दादा विखे पाटील तसेच जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री बाळासाहेब गाडेकर,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष श्री योगेश गोंदकर उपस्थित होते.