वाकी -मान्हेरे- देवगाव रस्त्याची दुर्दशा नागरकांनी दिला आंदोलनाचा इशारा

अकोले प्रतिनिधी
वाकी मान्हेरे देवगाव रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्ता दुरुस्तीसाठी परिसरातील नागरकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे
, वाकी बंगल्याकडून देवगाव कडे जाताना, मान्हेरे गावापासून पुढं रस्ता हा प्रचंड मोठ-मोठाले खड्डे पडून मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झालेली आहे. सदरचा रस्ता हा अनेक गावांना जोडणारा महत्वाचा व प्रमुख रस्ता आहे. सदर रस्त्यामुळे त्या रत्यावरून दररोज शेकडो प्रवासी प्रवास करीत असतात. अनेक वेळा रात्री अपरात्री नागरिकांना अत्यावश्यक सेवेसाठी या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो. रात्रीच्या वेळी अंधारात खड्ड्यांचा अंदाज न आल्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटे मोठे अपघात घडल्याच्या घटना झालेल्या
आहेत. त्याचप्रमाणे सदर रस्ता हा वळणाचा असल्याने त्याठिकाणी कोणतेही रिफ्लेक्टर तसेच सूचना फलक वळणाच्या ठिकाणी लावलेले नाहीत. तसेच या रस्त्याच्या साइडला साईड पट्य्या तसेच पाणी जाण्यासाठी चारी देखील खोदलेल्या नाहीत.यासंदर्भात दिनांक. 17 / 2 12025 रोजी आपणास लेखी निवेदनाद्वारे रस्त्याचे काम करण्यासंदर्भात विनंती करण्यात आली होती. त्यावेळी सदर रस्ता मंजूर
असून लवकरच कामाला सुरुवात होईन, अशी तोंडी माहिती आम्हाला दिलेली होती. सदर
निवेदनावर पंचक्रोशीतील अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच नागरिकांच्या सहया देखील होत्या. असे असताना आजपर्यंत सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजूर यांच्या कडून सदर रस्त्याचे कोणतेही काम सुरू केलेले नाही. तरी आपणास सदर निवेदनाद्वारे विनंती करण्यात येते की, सदर खड्डेमय रस्त्याचे काम ७ दिवसाचे आत सुरू करण्यात यावे, अन्यथा नाईलाजास्तव सदर रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू होने साठी पंचक्रोशितील सर्व जनतेला सोबत घेऊन सामान्य जनतेला

झालेल्या गैरसोईबद्दल आम्हाला नाईलाजास्तव सदर खड्डेमय रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.असा इशारा सिद्धेशवर लांघी, गणेश खाडे, मच्छिंद्र इदे गोविंद महाराज घोरपडे ,बूधा धोंगडे रघुनाथ बारामते सोनाली धांडे अंकुश घोडे लहू धांडे सुनिल धांडे ओमकार सुकटे, किसन पोटकुले शितल धिंदळे राजेंद्र गभाले, धोंडू धिंदळे नवनाथ धिंदळे देवराम भांगरे सिताराम भांगरे दिनेश घोरपडे उज्वला किरवे ,जिजा घोरपडे ,मनिषा धराडे,गोरख गभाले , किखे संजय ,मनेश गभाले गिताराम खेताडे यांनी दिला आहे आर पी आय चे तालुका युवक अध्यक्ष विजय पवार यांनी परिसरातील नागरिकांच्या आंदोलनाला पाठींबा दिला असून वेळीच दखल न घेतल्यास राजूर बांधकांम विभागा विरुद्ध आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे