सरकारी काम…. सहा महिने थांब’

डी बी टी च्या नावाखाली अकोल्यात निराधार अनुदान रखंडले
अकोले प्रतिनिधी
सामाजिक न्याय विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना अकोले तालुक्यात गत चार पाच महिन्यांपासून मानधनच वाटप करण्यात आले नाही परीणामी या लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे अनेक लाभार्थी हे औषध उपचारासाठी अडचणीत सापडले आहे उपचारा अभावी काही मृत्युच्या दाढेत ओढावले जात आहेत
. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ अशाच म्हणीप्रमाणे अकोले तालुक्यात वृद्धांची अवस्था झाली आहे डिबीटीच्या नावाखाली आणि केवायसीच्या नावाखाली तालुक्यातील निराधार लाभार्थ्यांना गत पाच महिन्यांपासून मानधन दिले गेले नाही. सप्टेंबर २०२४ ते फेब्रुवारी २०२५ पर्यंतचे जवळपास सहा महिन्यांचे मानधन रखडले आहे तहसील कार्यालय तसेच बँकांमध्ये निराधार वृद्ध वारंवार चौकशी करत आहे मात्र के वाय सी व डीबीटी हे शब्द कानी पडत आहे शेकडो लाभार्थी आजही या अनुदानापासून वंचितच राहिले असल्याचे पहावयास मिळाले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसह अनेक योजनांतील लाभार्थ्यांना वेळेवेवर मानधन दिले जाते परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना चार ते पाच महिन्यांपासून वेतन दिले जात नाही हे दुर्दैव असल्याचे लिंगदेव चे माजी सरपंच गोविंद कातोरे यांनी म्हटले आहे तर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना रखडलेले एकुण वेतन न मिळाल्यास आंदोलन केले जाईल असा इशारा आर पी आय चे युवक तालुका अध्यक्ष विजय पवार यांनी दिला आहे