पी एम किसान योजनेत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी बंधनकारक – तहसीलदार सतीश थेटे

अकोल्यातील 17,558 लाभार्थीना करावी लागणार e kyc
अकोले प्रतिनिधी
पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी दिली
ई- केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया 5 सप्टेंबर 2022 पर्यंत पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पी एम किसान सन्मान निधीच्या पुढील हप्त्याचा लाभ दिला जाणार नाही, याची सर्व लाभार्थ्यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी असे सतीश थेटे यांनी म्हटले आहे
तरी सर्व लाभार्थी यांनी www.pmkisan.gov.in या website ला जाऊन farmer corner या टॅब मध्ये किंवा pmkisan मोबाईल ऍप मध्ये OTP द्वारे मोफत e -KYC करता येईल(सोबत लिंक दिली आहे) किंवा नजिकच्या CSC केंद्राशी संपर्क साधुन आपली e-KYC तात्काळ करुन घ्यावी
अधिक माहितीसाठी कृषी सहाय्यक,ग्रामसेवक किंवा तलाठी यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
अकोले तालुक्यात एकूण 40,038 लाभार्थी
पैकी 22,480 लाभार्थींची e kyc पूर्ण झाली असून
17,558 लाभार्थी अद्याप बाकी आहेत
तहसीलदार अकोले यांनी याबाबत तालुक्यातील सर्व 90 csc केंद्र चालकांची काल बैठक घेऊन eKYC करण्यासाठी मार्गदर्शन केले . लाभार्थ्यांचे यादीप्रमाणे physical verification तसेच सर्व 100% लाभार्थ्यांनी eKYC करून घ्यावी . 5 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे . असे तहसीलदार सतीश थेटे यांनी म्हटले आहे
येथे यादी चेक करा
सोबत e-KYC करण्यासाठी लिंक दिलेली आहे
https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx