भंडारदरा परिसरात सुरु असलेले निकृष्ट दर्जाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले!

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
भंडारदरा धरणाच्या परिसरात सुरु असलेल्या निकृष्ट दर्जाच्या कामाविरुद्ध भंडारदरा गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला
कामाच्या क्वाॅलीटीत जो पर्यंत सुधारणा होत नाही तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नसल्याचा ईशारा सार्वजनिक बांधकाम खात्याला दिला आहे .
अकोले तालुक्यातील रंधा धबधबा ते भंडारदरा धरणाच्या परीसरातुन वारंघुशी फाट्यापर्यंत रस्त्याचे काम सुरु असुन अतिशय संथ गतीने हे काम चालु आहे .त्यातच जे काम आत्तापर्यंत या रस्त्याचे काम झाले आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याचे मत भंडारदरा गावातील ग्रामस्थांनी मांडले आहे .तसेच भंडारदरा धरणाच्या सांडव्याजवळ धरण भरल्यानंतर रस्त्यावरुन कायम पाणी वाहत असते .त्यामुळे हा रस्ता कितीही चांगला केला तरी खराब होतो . म्हणुनच रस्त्याचे काम करणा-या ठेकेदाराने हे पाणी वाहुन जावे या उद्देशाने सांडव्याच्या परीसरात नळ्या टाकल्या आहेत .पंरतु ह्या नळ्यामधुन धरण भरल्यानंतर वाहणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने पुर्ण क्षमतेने वाहुन जाऊ शकत नाही .त्यासाठी मोठ्या आकाराच्या ब-याच ठिकाणी नळ्या टाकणे गरजेचे आहे .भंडारदरा गावचे सरपंच पांडु खाडे यांनी ठेकेदारास सांगुनही छोट्याच आकाराच्या नळ्या टाकल्या गेल्याने भंडारदरा गावच्या संरपंचासह ग्रामस्थ आक्रमक होऊन त्यांनी सुरु असलेले काम बंद पाडले .जोपर्यंत या धरणाच्या सांडव्याजवळील नळ्या मोठ्या आकाराच्या टाकल्या जात नाही व कामाच्या क्वालीटीत सुधारणा होत नाही तोपर्यंत हे काम सुरु होऊ देणार नाही असा ईशारा ग्रामस्थांनी दिला आहे .पांडु खाडे यांनी व ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खाते ..राजुर यांना रस्त्याच्या निकृष्ट कामा संदर्भात निवेदन दिले आहे .