भारतीय जैन संघटनेच्या पिंपळनेर शहराध्यक्षपदी दिनेश कोचर तर सचिवपदी सुनील गोगड

————————————-
(संजय महाजन) :
पिंपळनेर येथील महावीर भगवान भारतीय जैन संघटनेची बैठक नुकतीच संपन्न झाली असून या बैठकीत पिंपळनेर शहर कार्यकारणी गठीत करण्यात आली.
येथील भारतीय जैन संघटनेच्या पिंपळनेर शहराध्यक्षपदी दिनेश अशोक कोचर यांची नियुक्ती करण्यात आली.
कार्यकारणी पुढीलप्रमाणे
भारतीय जैन संघटना शहराध्यक्ष पदी दिनेश अशोक कोचर, उपाध्यक्षपदी कल्पेश टाटीया, तुषार कोषाध्यक्ष प्रदीप संघवी, सचिव म्हणून सुनील सुमेरमल गोगड, यांची नियुक्ती करण्यात आली.
नवनियुक्त कार्यकारणीस खानदेश विभाग अध्यक्ष चंद्रकांत डागा यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. पिंपळनेर येथे महावीर भवनात झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात ही कार्यकारणी गठीत करण्यात आली.
याप्रसंगी कार्यक्रमात अध्यक्षस्थानी खानदेश विभाग अध्यक्ष चंद्रकांत डागा हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून खानदेश विभाग उपाध्यक्ष जोशीला पगारिया साक्री, खानदेश विभागीय कार्यकारणी सदस्य अजित कटारिया साक्री, प्रकाशचंद खिचा,नरडाणा, संदीप मुनोत शिरपूर, सचिन कोठारी धुळे, निखिलजी टाटीया साक्री,नरेश चोरडिया,अजित टाटीया, साक्री,मनीष टाटिया, निखिल सांडेचा, धुळे,अतीश सेठिया,विनयकुमार टाटीया, तसेच भारतीय जन संघटनेचे माजी शहर अध्यक्ष रिखबचंद जैन, प्रतिभा चोरडिया, सुभाष गोगड, सुभाष राका, तुषार चोरडिया, महावीर गोगड, नरेश चोरडिया, कल्पेश टाटीया, महेश टाटीया,दिनेश कोचर, दिनेश गोगड, यावेळी उपस्थित होते.
खानदेशी विभागीय अध्यक्ष चंद्रकांत डागा यांनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय जैन संघटना आता कात टाकत असून आंतरराष्ट्रीय पातळीवर या संघटना काम करीत आहेत. भारतीय जैन संघटनेचे काम १२ राज्यात आहे.तसेच ४५० शाखा महाराष्ट्रात सुरू आहेत.भारतीय जैन संघटनेने वर्षभरात 14 कार्यक्रम हाती घेतले आहेत , यात प्रामुख्याने शाकाहार दिवस, व्यंजन, यात्रा दिवस,आरोग्य शिबीर,युवा दिन, पाणी व्यवस्थापन, दुष्काळ मुक्त महाराष्ट्र,मातृत्व दिन, पर्यावरण दिन, महिला दिन, शेतकरी आत्महत्या विषय, असे विविध कार्यक्रम संघटनेच्या माध्यमातून करावयाचे आहेत.शासनाने जैन समाजाचे कौतुक केले असून राज्यातील व देशातील जीडीपी हा जैन समाजाकडून जात असल्याचे सांगितले, संघटनेत कार्यकर्ता कायम राहतो, संघटनेच्या बाबतीत बोलताना पुढे म्हणाले की संघटनेत पद विशिष्ट काळापुरते मर्यादित असते मात्र कार्यकर्ता म्हणून संघटनेत स्थान कायम टिकते. कार्यकर्ता हा संघटनेचा आत्म असल्याचे त्यांनी सांगितले, समाजातील मुलांना मूल्यशिक्षण समजावण्याची गरज आहे भारतीय जैन संघटना एक परिवार आहे. एकदिलाने काम करा, प्रतिष्ठा बाजुला करून समाजाचे काम करा, आपत्कालीन काम करा, शेतकरी आत्महत्या विषय, बदलू तर पुढे जाऊ, प्रत्येक कामासाठी स्वतंत्र समिती काम करीत असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दिनेश जैन यांनी केले. यावेळी राजेंद्र गवळी, विशाल गांगुर्डे,अंबादास बेनुस्कर यांच्या सह उपस्थितांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार व स्वागत करण्यात आले.