रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या अध्यक्षपदी डॉ.रवींद्र डावरे,उपाध्यक्षपदी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते,
अकोले /प्रतिनिधी
रोटरी क्लब अकोले सेंट्रल च्या अध्यक्ष पदी डॉ.रवींद्र डावरे,उपाध्यक्ष पदी प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, सेक्रेटरीपदी सुनील नवले तर खजिनदार पदी रोहीदास जाधव यांची निवड करण्यात आली. या नूतन पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण समारंभ विठ्ठल लॉन्स येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी पदमश्री सौ राहीबाई पोपरे, आ.डॉ.किरण लहामटे, मोटिव्हेशनल स्पीकर अविनाश सिसोदे, उपप्रांतपाल गौरव भुजबळ,नगराध्यक्षा सौ.सोनालीताई नाईकवाडी, जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर,रोटरी चे माजी अध्यक्ष सचिन आवारी,सेक्रेटरी डॉ.सुरींदर वावळे यांचे सह ममताबाई भांगरे,शांताबाई धांडे, संगमनेर रोटरी चे अध्यक्ष रो.ऋषिकेश मोंढे, सेक्रेटरीरो.आनंद हासे,रो.महेश वाकचौरे, रो.मंडलिक,अकोले तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजयराव पोखरकर, सेक्रेटरी अल्ताप शेख,सुनील गीते, हेमंत आवारी,राजेंद्र उकिरडे,प्रवरा विद्यालयाचे मुख्याध्यापक शांताराम मालुंजकर,नगरसेवक सागर चौधरी,विजय पवार,सौ शीतल वैद्य,सौ.जनाबाई मोहिते, मुख्याधिकारी डॉ. विक्रम जगदाळे, वीज वितरण चे अभियंता ज्ञानेश बागुल,डॉ.साहेबराव वैद्य,प्रा.राजेंद्र कर्पे,धनंजय मोहिते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. रोटरी क्लब ही आंतरराष्ट्रीय पातळीवर सामाजिक व विधायक क्षेत्रात काम करणारी संस्था आहे. सेवा हेच त्यांचे ध्येय व उद्दिष्ट आहे.आणि त्या भावनेतून रोटरी क्लब अकोले काम करीत आहे.त्यांचे सामाजिक,शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रम अतिशय प्रेरणादायी आहे.त्यांचा पद्ग्रहण सोहळा हा आदर्श असून मोठ्यामनाने एकमेकाला पदभार देताना पहाणे ही आनंददायी बाब आहे.कोणीही कोणाचे पाय ओढताना दिसत नाही.त्यांनी एक गाव दत्तक घेऊन आदर्श गाव निर्माण करावा अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी पदमश्री सौ.राहीबाई पोपरे,फूड मदर सौ. ममताबाई भांगरे, सौ.शांताबाई धांडे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा डॉक्टरेट पदवी मिळविलेले डॉ. विश्वासराव आरोटे,जि. प.आदर्श शिक्षक संतोष सदगीर,बायफ चे नाशिक विभागीय अधिकारी जितीन साठे,12 पेटंट मिळविणारे डॉ.सुरींदर वावळे,महिला नगराध्यक्ष सौ.सोनाली नाईकवाडी, उपक्रमशील शिक्षिका तथा नगरसेविका सौ.शितल वैद्य यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी श्रीराज सुधीर फरगडे या विद्यार्थ्यांने इ.10 वी मध्ये शिकत असताना वाईज डॅडज् अॅडव्हाईस फॉर बुलेटप्रुफ गोल्स हे पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.तसेच रोटरीयन्स च्या मुलींनी ओडिसी नृत्य सादर करून सर्वांची मने जिंकली, या नृत्यास राजेंद्र नाईकवाडी यांनी 1001 रुपयांचे बक्षीस दिले. स्वागत संस्थापक अध्यक्ष अमोल वैद्य यांनी केले तर माजी अध्यक्ष सचिन आवारी,विद्यमान अध्यक्ष डॉ.सुरींदर वावळे यांनी रोटरी च्या कामाचा आढावा घेतला.सूत्रसंचालन हभप दीपक महाराज देशमुख यांनी केले .पाहुण्यांचा परिचय ऍड.बी.जी.वैद्य यांनी करून दिला.आभार रोटरी चे सेक्रेटरी सुनील नवले यांनी मानले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होऊन सर्वानी स्नेह भोजनाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माजी अध्यक्ष सचिन देशमुख, सचिन शेटे,सचिन आवारी,डॉ.सुरींदर वावळे, संस्थापक अमोल वैद्य,ऍड.बी.जी.वैद्य माजी उपाध्यक्ष संदीप दातखिळे, खजिनदार गंगाराम करवर,डॉ.जयसिंग कानवडे,यश चोथवे,मयूर रासने,नूतन पदाधिकारी, व सर्व रोटरी क्लबचे पदाधिकारी, सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले
. –“””””””