उडदावणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सांस्कृतिक स्पर्धत यश

संजय महानोर
भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागामध्ये असणाऱ्या उडदावणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अहिल्यानगर येथे झालेल्या सांस्कृतिक स्पर्धक अकोले तालुक्याचे नेतृत्व करत दुस-या क्रमांकाला गवसणी घातली असुन शाळेच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अकोले तालुक्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यात असलेल्या उडदावणे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये गोंधळगीत साजरे करत दुसरा क्रमांक मिळविला. ह्या शाळेने तालुकास्तरीय स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवत जिल्हा पातळीवर जाण्याचा बहुमान मिळविला होता . जिल्हा पातळीवर मुलांना पाठबळ देण्यासाठी वन्यजीव विभाग , उडदावणे ग्रामपंचायत व गावातील ग्रामस्थ मुलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती .या मुलांसाठी आर्थिक स्रोत हा या लोकांनी उभा करत गावाचे नाव मोठे करण्यासाठी सहकार्य केले . जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या चिमुकल्यांनी गावकऱ्यांचा विश्वास सार्थ करत अहिल्यानगर येथे बक्षिसाला गवसणी घातली . २०१९ पासुन ते २०२५ पर्यंत या शाळे ५ वेळा अहिल्यानगर येथे अकोले तालुक्याचे प्रतिनिधित्व केले आहे.स्परधेया गोंधळगितासाठी संबळवादक म्हणुन गोविंद सोनवणे यांनी तर पेटीवादकासाठी रामचंद्र मधे यांची साथ लाभली . या गितासाठी शकुंतला उगले, रामकृष्ण मधे , बाळू बांडे, विष्णूदास चौधरी,मनोहर आढळ , गणपत उघडे , सोमनाथ उघडे , चंद्रकला तळपे , ठकुबाई लांघी,शिरिष मधे या शिक्षकांचे सहकार्य लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल उडदावणे गावच्या प्रथम नागरिक गि-हे , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बुवाजी गांगड, आदिवासी सेवक सखाराम गांगड, कुसाभाऊ मधे, बच्चू गांगड सुधीर मोरे, युवराज सोनवणे , पांडू गिर्हे , संजू गिर्हे , गोविंद गिर्हे , शांताराम गिर्हे ,तसेच वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी रुपेश गावित, वनपाल शंकर लांडे , वनपाल चंद्रकात तळपाडे व सर्व कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.