अकोल्यात 21 सप्टेंबरला महा फेरफार अदालत – तहसीलदार

अकोले प्रतिनिधी
सेवा पंधरवाडा अंतर्गत अकोल्यात महा फेरफार अदालत आयोजित करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी केले आहे
राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा
दिनांक १७ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ०२ ऑक्टोबर २०२२ पर्यंत या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्याचे शासनाने निश्चित केला आहे. यामध्ये महा फेरफार
अदालत दिनांक २१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय अकोले येथे आयोजीत केलेली आहे. त्यामध्ये तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी उपस्थित राहुन १५ दिवसांपेक्षा जास्त प्रलंबीत फेरफार निर्गत करण्याचे कामकाज करणार
आहेत.
तालुक्यातील सर्व शेतक-यांना आवाहन करण्यात येते की, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीत प्रबंधीत फेरफार असतील तर आपलेकडील आवश्यक त्या पुराव्यांसह दिनांक २१/०९/२०२२ रोजी तहसिल कार्यालय अकोले येथे उपस्थित रहावे. असे आवाहन तहसीलदार श्री थेटे यांनी केले आहे
