
प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
नाशिक नगरीत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला गुरु आराध्या फाउंडेशन च्या द्वितीय वर्धापनानिमित्त राज्यस्तरीय सन्मान सोहळा नाशिक नगरीत रविवारी २३ फेब्रुवारी रोजी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा महाराष्ट्र शासन नोंदणी प्राप्त गुरु आराध्या फाउंडेशन च्या वतीने महाराष्ट्र कोहिनूर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला हातात हात घेऊन दहा हिरे पहा जरा आरशाकडे अकरावा दिसेल कोहिनूर पहा स्वतःकडे गुरु आराध्या फाउंडेशन नासिक संस्थापिका अध्यक्ष डॉक्टर सर्व अर्चनाताई आहेर गणोरेकर यांचे विचार आचार परिपूर्ण करून समाजामध्ये जनजागृती व्हावी यासाठी अर्चना ताईंची तळमळ सतत चालू असते या कार्यक्रमास माननीय सीमाताई हिरे नाशिक पश्चिम आमदार यांच्या कन्या तसेच माननीय श्री मधुकर शिवाजी कड साहेब वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाशिक माननीय श्री समाधान देवरे संस्थापक अध्यक्ष रायगड प्रतिष्ठान सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री दिनकर अण्णा पाटील नगरसेवक नाशिक मनपा ह भ प राहुल जी महाराज साळुंखे विश्वस्त श्री संत निवृत्तीनाथ महाराज समिती संस्थान त्र्यंबकेश्वर माननीय श्री भूषण भास्कर पगार कळवण उद्योजक संचालक रेणुका इंडस्ट्रीज लिमिटेड माननीय श्री सचिन गंगाधर गुंजाळ संगमनेर नायब सुभेदार देशसेवा नाशिक या सर्व मान्यवर मान्यवरांच्या प्रमुख अतिथी भवन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा पार पडला

ब्रह्मजीत कला महिला भजनी मंडळाला धार्मिक क्षेत्रात भजनाचा प्रचार व प्रसार केल्याबद्दल तसेच घराघरात धार्मिक वातावरण निर्मिती भजनाच्या माध्यमातून समाजात संस्कार रुजवून आपली वारकरी परंपरा जपल्याबद्दल निवड करण्यात आली मंडळाच्या आधारस्तंभ माननीय ह भ प एकनाथ महाराज सदगीर अध्यक्ष विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत मंडळाच्या अध्यक्षा सविताताई पगार उपाध्यक्ष गीता ताई गवळी आरतीताई दखणे सारिका ताई ठोंबरे मंदोदरीताई पाटील आणि अनिताताई आहेर सविता ताई शिंदे उज्वला ताई शिंदे कल्पनाताई शिरापुरी योगिताताई जगताप या सदस्यांना कोहिनूर रत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणून सर्व स्तरावर कौतुकाचा वर्षाव होत आहे