अकोल्यात समाजकल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह मंजूर करा – विजय पवार

अकोले प्रतिनिधी
राज्य शासनाच्या समाज कल्याण विभागाचे अकोले तालुक्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यां साठी शासकीय वसतिगृह मंजूर करावे अशी मागणी अकोले तालुका आरपीआयचे युवा अध्यक्ष विजय पवार यांनी केली आहे
अकोले तालुका हा आदिवासी दुर्गम भाग आहे तालुक्यात आदिवासी समाजा बरोबरच मागासवर्गीय समाज मोठ्या प्रमाणात आहे
अनुसुचित जाती समाजाचे मुलां ना तालुक्याचे ठिकाणी शिक्षण घेत असताना शासकीय वसतीगृह नसल्याने इतरत्र राहून शिक्षण घ्यावे लागते यात मुलांची गैरसोय होत आहे
तालुक्यातील मुलां मुलींना इतरत्र शिक्षणासाठी जावे लागते मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतीगृह नसल्याने मागासवर्गीय समाजाची अवहेलना होत आहे
अकोले तालुक्यात मागासवर्गीय समाजाचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आहे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे मागासवर्गीयां साठीचे शासकीय वसतिगृह आहेत मात्र अकोले तालुक्यात अद्यापही मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी तालुका स्तरावरील शासकीय वसतीगृह नाही यामुळे अकोले तालुक्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शैक्षणिक हेळसांड होत आहे
अकोल्या तालुक्याचे ठिकाणी निवासाची निवास भोजनाची व्यवस्था व्हावी यासाठी तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे डॉ बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाला विधानसभेच्या अधिवेशनात खासबाब म्हणून तातडीने मंजुरी द्यावी यासाठी आपण केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले राज्याचे समाज कल्याण मंत्री ना संजय शिरसाठ तसेच अकोल्याचे आमदार डॉ किरण लहामटे यांच्याकडे निवेदन दिले असल्याचे श्री विजय पवार यांनी सांगितले
सध्या विधानसभेचे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनात आमदार लहामटे यांनी या मागणी साठी प्रश्न उपस्थित करून ही मागणी पूर्णत्वाला न्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे
अकोले तालुक्यात आदिवासी समाजाच्या मुलांसाठी शासकीय आश्रम शाळा वसतिगृहाच्या अनेक ठिकाणी आहेत मात्र अकोले सारख्या तालुक्याच्या ठिकाणी समाज कल्याण विभागाचे शासकीय वसतिगृह नसणे ही अतिशय दुर्दैवी बाब आहे यासाठी प्रशासनाने तात्काळ पाठपुरावा करून अकोले येथे सुसज्ज असे मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वस्तीगृहाच्या चा मंजुरीसाठी प्रयत्न व्हावेत. याबाबत रिपब्लिकन पार्टी न ऑफ इंडिया पक्षाचे वतीने आपण लवकरच जन आंदोलन उभारणार असल्याचे श्री विजय पवार यांनीं सांगितले