माजी खासदार तुकाराम गडाख यांना अखेरचा निरोप!

माजी खासदार तुकाराम गडाख यांचे निधनाने
जिल्ह्यात शोककळा
विजय खंडागळे
सोनई प्रतिनिधी
नगर दक्षिणचे माजी खासदार तुकाराम गडाख यांना आज अतिशय शोकाकुल वातावरनातं अखेरचा निरोप देण्यात आला
ते ७३ वर्षाचे होते,त्यांच्या पाठीमागे पत्नी ,एक मुलगा रविराज, व दोन मुली एक भाऊ,चुलते असा मोठा परिवार आहे.
मूळ गाव पाणसवडी( सोनई) गाव सह अनेकांनी दुःख व्यक्त केले आहे.
त्यांचा जन्म पाणसवडी येथे झाला असून जन्म १९५० साली झाला आहे,ते बी.एस्सी असून १९९१ मध्ये अपक्ष म्हणून नेवासा शेवगाव विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून निवडून आले होते.
त्यानंतर २००४/ २००९ राष्ट्रवादीचे खासदार म्हणून निवडून आले होते. त्याचा राजकीय संघर्ष अंगीकृत असल्याने उभ्या देशातील राजकीय पक्षांनी पहिला होता.एक संघर्ष शील वैक्तिमत्व मतदारसंघात तेवत ठेवण्याचे काम करीत होते.
जेष्ठ समर्थक मार्गदर्शक ज्ञानदेव गडाख यांचे ते पुतणे , माजी जिल्हा परिषदेचे सदस्य सुरेश गडाख यांचे ते चुलत भाऊ,होते.मुलगा आदर्श विद्या मंदिर या शैक्षणिक संस्था चे सचिव रविराज गडाख यांचे ते वडील होत.
माजी खा.गडाख यांनी अल्पवधीत शिक्षण संस्था,सेवा सोसायटीचा पाया रचला होता.ते सतत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत.
शेवटपर्यंत ते जनतेच्या सुखा दुःखात सामील होते,अचानक त्रास जाणू लागल्याने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांचा कार्यकर्त्यांचा संच नेवासा तालुक्यात प्रचंड आहे.
अंत्यसंस्कार वेळी माजी मंत्री शंकरराव गडाख, खा.सदाशिव लोखंडे,माजी खा.भाऊसाहेब वाकचौरे,माजी. आ.बाळासाहेब मुरकुटे, माजी.आ,शिवाजी कर्डीले,माजी.आ.पांडुरंग अभंग, मा.आ.संभाजी फाटके,विठ्ठल लघे,मुळा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष उदय गडाख,भाजपचे तालुका अध्यक्ष नितीन दिनकर,भाजपाचे राष्ट्रीय सदस्य अभय आगरकर,दिलीप मोटे,शिवसंग्राम चे अध्यक्ष सुरेश शेटे, जिल्हा परिषदेचे हर्षदा काकडे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, देविदास साळुंके, युवा कार्यकर्ते प्रकाश शेटे,शेतकरी संघटनेचे अबादास कोरडे,ह.भ.प.बाळकृष्ण महाराज सुडके,भगवान गंगावणे,यांच्यासह सर्व पक्षाचे नेते, अधिकारी, कार्यकर्ते,नागरिक आदी सामील होऊन श्रद्धांजली अर्पण केली.
