डॉ. पंकज आशिया अहिल्यानगरचे नवे जिल्हाधिकारी

अहिल्यानगर, दि.७ – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या जागी शासनाने नव्याने नियुक्त केलेले जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया आज रुजू झाले. प्रभारी जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी त्यांचे स्वागत केले व त्यांना पदभार सोपवला.
डॉ.आशिया हे २०१६ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी आहेत. येथे रुजू होण्यापूर्वी ते यवतमाळ येथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यापूर्वी डॉ. आशिया जळगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी, भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त, नाशिक जिल्ह्यातील कळवण येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते.
डॉ.आशिया यांच्या भारतीय प्रशासकीय सेवेची सुरुवात यवतमाळ जिल्ह्यातून झाली आहे. या सेवेत आल्यानंतर एक वर्ष परिविक्षाधीन कालावधीत आर्णी येथे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, तहसीलदार व बाभुळगाव येथे गटविकास अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे.

जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांची पुणे येथे साखर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे प्रभारी जिल्हाधिकारीपदा पदभार होता. जिल्हाधिकारीपदी कोणाची नियुक्ती होणार, याबाबत अनेक नावे चर्चेत होते. अखेर राज्य शासनाने अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. पंकज आशिया यांची नियुक्ती झाली आहे. यवतमाळ जिल्हाधिकारी पदावरून त्यांची बदली झाली आहे.
डॉ. पंकज आशिया हे जोधपूर (राजस्थान) येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे वडील डॉक्टर तर आई गृहिणी आहे. त्यांनीही डॉक्टर बनावे अशी वडिलांची इच्छा होती. त्यामुळे त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस पदवी घेतली. पहिल्याच प्रयत्नामध्ये यूपीएससी उत्तीर्ण झाले त्यानंतर यूपीएससीचा अभ्यास सुरू केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये ते यूपीएससी उत्तीर्ण झाले. मात्र, त्यांना आय.ए.एस.ची रँक मिळाली नव्हती. तिसऱ्या प्रयत्नात ते आय.ए.एस. झाले. त्यांनी कोणताही खासगी क्लास न लावता स्वयंम अभ्यास करून हे यश संपादन केले. ते २०१६ बॅचचे आय.ए.एस. अधिकारी आहेत. देशात त्यांनी ५६ रँक मिळविली आहे. त्यांनी मालेगाव (नाशिक) येथे प्रांताधिकारी म्हणून काम करताना शहर कोरोना मुक्त करण्यासाठी राबविलेल्या उपक्रमाचे राज्यभर कौतुक झाले होते.