कोची (ता संगमनेर ) येथे गौंण खनिजाची चोरी महसूल प्रशासनाची मोठी कारवाई!

संगमनेर / प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोची गावाच्या डोंगरातून मोठ्या प्रमाणावर राजरोसपणे दिवसा मुरुमाची/गौंण खनिज तस्करी सुरू आहे .या भागातून हजारो ब्रास मुरूम तस्करांनी चोरून नेलाय. शनिवारी दुपारी पोकलेनने उपसा करून डंपरच्या साह्याने बिनधास्तपणे मुरूम वाहतूक सुरु होती. या घटनेची माहिती संगमनेरच्या महसूल प्रशासनाने डंपर पोकलेन ताब्यात घेतला असून आता कोणती कारवाई होणार याकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष आहे.
अनेक दिवसांपासून राजकीय वरदहस्थातून महसूल प्रशासनावर दादागिरी करत असलेला रहिमपूरचा आका चा हा उद्योग जाहीर झाल्यानंतर व याबाबत गावकऱ्यांनी प्रशासनाला पुराव्यांसह माहिती दिल्यानंतर प्रांताधिकारी शैलेश हिंगे ,तहसीलदार धीरज मांजरे यांनी मंडळाधिकारी जेडगुले आणि तलाठ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात मुरूम उत्खनन केले आहे.या ठिकाणी पोकलेनच्या माध्यमातून डंपरद्वारे मुरूम वाहतूक सुरू होती. महसूल प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी आल्याचे पाहताच पोकलेन चालकाने पोकलेन जागेवरच सोडून धूम ठोकली .त्यानंतर हा डंपर महसूल प्रशासना जप्त केला आहे. विशेष म्हणजे संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथील आकाचा हा पोकलेन असून या आकावर आणि त्याच्या पंटर वर राजकीय वरदहस्त असल्याने हे मुरूम तस्कर प्रशासनाला ही झुमानत नाहीत . अनेक वेळा त्याने महसूल मधील कर्मचारी भरारी पथक व इतरांना शिवीगाळ केली आहे.

दिवसाढवळ्या संगमनेर तालुक्यातील डोंगर पोखरून या तस्करांनी मोठी मायाजाल जमवली आहे. गेल्या अनेक दिवसापासून या ठिकाणी हजारो डंपर मुरमाची तस्करी केल्याचे दिसून येते. मोठमोठे डोंगराचे पोट ओरबाडून या तस्करांनी आपल्या तुंबड्या भरल्या आहेत .घटनेची माहिती समजतात तालुका पोलीस ठाण्याचे पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोकलेन चालक पळून गेल्याने हा पोकलेन घेऊन कसा यायचा असा प्रश्न महसूल आणि पोलीस प्रशासनापुढे उभा होता. या कारवाईत महसूल प्रशासनावर मोठा दबाव असल्याचाही दिसून आलं असं असलं तरी महसूल प्रशासनांना हा दबाव झुकारून ही कारवाई केली आहे. या मुरूम तस्करांनी गेल्या दोन महिन्यापासून कोकणगाव कोची माची येथील डोंगर अक्षरशः पोखरून काढले आहेत .आशा या मुरम तस्करांवर मोका अंतर्गत कारवाई करणं गरजेचं आहे. यापूर्वीही त्यांच्यावर कारवाई झाली होती मात्र त्यांनी तहसील व पोलीस स्टेशन आवारातून आपली वाहने पळून नेली त्यामुळे तालुक्यात मोठी संतापाची लाट निर्माण झाली आहे.
मात्र आता पुराव्यांसह जाग्यावर पकडल्याने याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे