इतर

निरोगी समाजासाठी झटणाऱ्या आरोग्यविरा – कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात

संगमनेर-महाराष्ट्राचे प्रमुख नेते असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे स्वच्छ प्रतिमा,कार्यक्षमता, अविश्रांत काम करण्याची पद्धत, साधेपणा, सुसंस्कृतपणा यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आधारवड आहे. हाच समाजकारणाचा वारसा जोपासत उच्चशिक्षित असूनही निरोगी समाजाचा ध्यास घेतलेल्या कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आपल्या कामातून तालुक्यातील जनतेत मोठी आपुलकी निर्माण केली केली असून त्या खऱ्या अर्थाने आरोग्यविरा ठरत आहेत.

एमबीबीएस चे शिक्षण झाल्यानंतर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी ब्लड कॅन्सर मधून एमडी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशातील नामांकित असलेल्या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मधील ब्लड कॅन्सर विभागात त्या कार्यरत झाल्या आहेत. वैद्यकीय सेवा करताना त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. अगदी 24 – 24 तास सलग प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करून त्यांनी रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही  परिवाराचे नाव पुढे केले नाही. सामान्य मुलगी म्हणून शिक्षण घेतले. एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राचार्यांनी त्यांना विचारले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. तुम्हीही थोरात आहात त्यावर डॉ.जयश्रीताईंनी सांगितले ते माझे आजोबा आहेत. व प्राचार्यांनी विचारले मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या तुम्ही कन्या असूनही कधीही सांगितले नाही. त्यावेळी अत्यंत नम्रपणे डॉ.जयश्रीताई त्यांनी सांगितले की, माझे वडील, आजोबा यांचा साधेपणा हा आमच्या परिवाराचा संस्कार आहे. शिक्षणामध्ये मी कशाला त्यांचे नाव पुढे घेऊ. यावर प्राचार्यांनी या मुलीचे खऱ्या अर्थाने कौतुक केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवाव्रत त्यांनी कायम जपला. कॅन्सर सारख्या भयावह आजाराला सर्वजण घाबरतात. मात्र लढवय्या आरोग्यविरेने अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करून कॅन्सरला हरवले आहे. वाढता कॅन्सर हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. याचा विचार करून डॉ.जयश्रीताईंनी कॅन्सर बाबत जागृती सुरू केली आहे.

मागील चार वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात युवतींचे मोठे संघटन करून तरुणींसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिरे,गणपती काळामध्ये निर्माल्याचे संकलन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन ,कॅन्सर विषयी जनजागृती ,हिमोग्लोबिन तपासणी असे सातत्याने विविध उपक्रम राबवले आहे.

दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करून कॅन्सरसह कोरोना वर उपचार केले.यानंतर वसंत लॉन्स येथे कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी, व आशा सेविका यांचा केलेल्या कौतुक सोहळा तर राज्यभरासाठीचा पॅटर्न ठरला. आजोबा तीर्थरूप सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, वडील नामदार बाळासाहेब थोरात, आई सौ कांचनताई थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांचेकडून समाजकार्याचा वारसा घेऊन डॉ. जयश्रीताई अविरतपणे काम करत आहेत.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. पठार भाग,प्रवरा पट्टा, व तळेगाव पट्टा अशा भौगोलिक दृष्ट्या तीन विभागात विभागलेला असूनही प्रत्येक गावात वाडीवस्तीत जाऊन डॉ.जयाताईंनी प्रत्येक कुटुंबाची अस्थिवाईकपणे चौकशी केली आहे. तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती, महिलांशी सहजपणे होणारा संवाद, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, नम्रपणा, साधेपणा हा त्यांचा स्थायीभाव पाहून प्रत्येकाचे काळीज अभिमानाने भरून येत आहे.

ज्या ज्या वेळेस संगमनेर मध्ये मोठ मोठे कार्यक्रम आयोजित होत असतात त्या त्या वेळेस आलेल्या प्रत्येकाची अत्यंत जिव्हाळ्याने व आस्थेवाईकपणे चौकशी करणाऱ्या डॉ. जयाताई या प्रत्येकाला आपल्या कुटुंबातील सद निरोगी समाजासाठी झटणाऱ्या आरोग्यविरा – कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात

महाराष्ट्राचे प्रमुख नेते असलेले आमदार बाळासाहेब थोरात हे स्वच्छ प्रतिमा,कार्यक्षमता, अविश्रांत काम करण्याची पद्धत, साधेपणा, सुसंस्कृतपणा यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनतेचे आधारवड आहे. हाच समाजकारणाचा वारसा जोपासत उच्चशिक्षित असूनही निरोगी समाजाचा ध्यास घेतलेल्या कॅन्सर तज्ञ डॉ.जयश्रीताई थोरात यांनी आपल्या कामातून तालुक्यातील जनतेत मोठी आपुलकी निर्माण केली केली असून त्या खऱ्या अर्थाने आरोग्यविरा ठरत आहेत.

एमबीबीएस चे शिक्षण झाल्यानंतर डॉ.जयश्रीताई थोरात यांनी ब्लड कॅन्सर मधून एमडी शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर देशातील नामांकित असलेल्या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल मधील ब्लड कॅन्सर विभागात त्या कार्यरत झाल्या आहेत. वैद्यकीय सेवा करताना त्यांनी कधीही मोठेपणा दाखवला नाही. अगदी 24 – 24 तास सलग प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करून त्यांनी रुग्णांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्या जीवनात आनंद निर्माण केला आहे.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी कधीही  परिवाराचे नाव पुढे केले नाही. सामान्य मुलगी म्हणून शिक्षण घेतले. एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्राचार्यांनी त्यांना विचारले सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात हे अहमदनगर जिल्ह्यातील आहेत. तुम्हीही थोरात आहात त्यावर डॉ.जयश्रीताईंनी सांगितले ते माझे आजोबा आहेत. व प्राचार्यांनी विचारले मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या तुम्ही कन्या असूनही कधीही सांगितले नाही. त्यावेळी अत्यंत नम्रपणे डॉ.जयश्रीताई त्यांनी सांगितले की, माझे वडील, आजोबा यांचा साधेपणा हा आमच्या परिवाराचा संस्कार आहे. शिक्षणामध्ये मी कशाला त्यांचे नाव पुढे घेऊ. यावर प्राचार्यांनी या मुलीचे खऱ्या अर्थाने कौतुक केले.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सेवाव्रत त्यांनी कायम जपला. कॅन्सर सारख्या भयावह आजाराला सर्वजण घाबरतात. मात्र लढवय्या आरोग्यविरेने अनेक रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार करून कॅन्सरला हरवले आहे. वाढता कॅन्सर हे समाजासाठी अत्यंत चिंताजनक आहे. याचा विचार करून डॉ.जयश्रीताईंनी कॅन्सर बाबत जागृती सुरू केली आहे.

मागील चार वर्षापासून एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यात युवतींचे मोठे संघटन करून तरुणींसाठी विविध उपक्रम राबवले आहेत. आरोग्य शिबिरे,गणपती काळामध्ये निर्माल्याचे संकलन, ओला व सुका कचरा व्यवस्थापन ,कॅन्सर विषयी जनजागृती ,हिमोग्लोबिन तपासणी असे सातत्याने विविध उपक्रम राबवले आहे.

दोन वर्ष कोरोनाच्या काळामध्ये टाटा हॉस्पिटलमध्ये रात्रंदिवस काम करून कॅन्सरसह कोरोना वर उपचार केले.यानंतर वसंत लॉन्स येथे कोरोना काळामध्ये काम करणाऱ्या आरोग्य सेविका, अंगणवाडी, व आशा सेविका यांचा केलेल्या कौतुक सोहळा तर राज्यभरासाठीचा पॅटर्न ठरला. आजोबा तीर्थरूप सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, वडील नामदार बाळासाहेब थोरात, आई सौ कांचनताई थोरात व आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांचेकडून समाजकार्याचा वारसा घेऊन डॉ. जयश्रीताई अविरतपणे काम करत आहेत.

संगमनेर तालुका हा विस्ताराने मोठा आहे. पठार भाग,प्रवरा पट्टा, व तळेगाव पट्टा अशा भौगोलिक दृष्ट्या तीन विभागात विभागलेला असूनही प्रत्येक गावात वाडीवस्तीत जाऊन डॉ.जयाताईंनी प्रत्येक कुटुंबाची अस्थिवाईकपणे चौकशी केली आहे. तालुक्यातील विविध कार्यक्रमांना त्यांची उपस्थिती, महिलांशी सहजपणे होणारा संवाद, ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, नम्रपणा, साधेपणा हा त्यांचा स्थायीभाव पाहून प्रत्येकाचे काळीज अभिमानाने भरून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button