पत्रकार सुरेश खोसे पाटील यांचे पत्रकारितेत मोठे योगदान-खासदार डॉ.निलेश लंके

पारनेर – पारनेर तालुक्यात विविध वृत्तपत्रांसाठी पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अहिल्यानगर जिल्हा सचिव सुरेश खोसे पाटील यांचे पत्रकारिता व महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पारनेर तालुक्यासाठी मोठ्या योगदान असल्यामुळे त्यांची राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी त निवड होणे , ही तालुक्याच्या दृष्टीने भूषणावह बाब असल्याचे गौरवोद्गार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ . निलेश लंके यांनी काढले .
१९९२ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले व आज अखेर राज्यातील अनेक वृत्तपत्रांसाठी पारनेर तालुक्यात पत्रकार म्हणून काम करत असलेले व दैनिक पारनेर समर्थ चे संपादक सुरेश खोसे पाटील यांची नुकतीच महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या राज्य कार्यकारिणी वर निवड करण्यात आली , त्यानिमित्त त्यांचा खा.डॉ.निलेश लंके यांच्या कार्यालयात शाल , पुष्प गुच्छ देऊन व पुष्प हार घालून सन्मान करण्यात आला.त्यावेळी खा.डॉ.लंके पुढे म्हणाले की , पत्रकार हा लोकशाही चा चौथा स्तंभ आहे . समाजातील दुर्लक्षित प्रश्नांना इमाने इतबारे वाचा फोडण्याचे काम आपल्या लेखनी व्दारे पत्रकार असतात . माझ्या राजकीय क्षेत्रातील प्रगतीस पारनेर तालुक्यातील पत्रकारांचे फार मोठे योगदान आहे . त्यामुळे पत्रकारांचे कार्य मला जवळून परिचित आहे . तद्वतच सुरेश खोसे पाटील आपल्या ग्रामीण तालुक्यातून पत्रकारितेच्या लेखनीव्दारे सातत्याने स्वतः ला झोकून देऊन काम करत असतात , त्यांनी माझ्या महत्वाच्या राजकीय कारकिर्दीतील अलिकडच्या ५ महिन्यात १०० बातम्या प्रसिद्ध करून पत्रकारितेची चुणूक दाखवून दिली आहे , त्यांचे कौतूक करावे , तेवढे कमीच आहे . त्यांची राज्य कार्यकारिणीवर झालेली निवड ही पारनेर तालुक्याच्या दृष्टीने नक्कीच भूषणावह आहे . त्यांचा सन्मान करणे , हे लोकप्रतिनिधी या नात्याने माझे कर्तव्यच आहे , असे गौरवोद्गार ही खा.डॉ.निलेश लंके यांनी काढले.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पत्रकार सुरेश खोसे पाटील यांनी पत्रकार व राजकीय नेते हे नाण्याच्या दोन बाजू असून त्यांच्या तील सुसंवाद समाजाच्या दृष्टीने फार महत्वाचा असतो . पत्रकार हा समाजाचे आपण काही तरी देणे लागतो , या भावनेतून अंतकारणातून काम करत असतो , राजकीय नेत्यांनी केलेल्या सन्मानामुळे पत्रकारांना काम करताना जबाबदारी वाढते , असे ही पत्रकार खोसे पाटील म्हणाले .
यावेळी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.डॉ.निलेश लंके यांनी राजकीय क्षेत्रात ५ महिन्यांमध्ये केलेल्या कामांची १०० बातम्यांच्या माध्यमातून पत्रकार सुरेश खोसे पाटील यांनी राज्यातील वृत्तपत्रांमधून दखल घेतलेल्या बातम्यां ची कात्रण फाईल सुपुर्द केल्याने खा.डॉ.लंके देखील आश्चर्य चकित झाले व माझ्या राजकीय जीवनातील माझ्या कामांची बातम्यांच्या माध्यमातून दखल घेऊन माझ्या कामांना प्रसिद्धी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला .