
नाशिक /प्रतिनिधी डॉ. शाम जाधव
दिनांक ८/३/२०२५ रोजी ज्ञान मंदिर समिती देवळाली कॅम्प ठीक ११:०० वाजेला निवेदन देण्यासाठी ज्ञान मंदिर देवळाली कॅम्प बाजारपेठ व पोलीस स्टेशन विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यांच्यावतीने खालील मागण्या पूर्ण होने कामी निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवळाली कॅम्प संजय गीते यांना ज्ञान मंदिर समितीकडून देण्यात आले
त्याप्रसंगी देवळाली कॅम्प परिसरातील शिगवे बहुला, स्टेशन वाडी, लहवित गाव, भिम वाडी, संसरी गाव भगूर ह्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने बौद्ध बांधव व बौद्ध भगिनी हजारोच्या संख्येने विराट मोर्चामध्ये सामील झाल्या १. महाबोधी विहारावर संपूर्ण नियंत्रण पूर्ण बौद्ध धर्म यांच्या ताब्यात द्यावे २. महाबोधी विहार व्यवस्थापना कायदा १९४९ च्या कायद्यामध्ये सुधारणा करून व्यवस्थापन समितीमध्ये बौद्ध धर्मियांचे असावे ३. महाबोधी विहाराच्या धार्मिक व सांस्कृतिक बाबी मध्ये बाह्य धर्मियांचा हस्तक्षेप नसावा वरील विषयांच्या अनुषंगाने मोर्चा द्वारे निवेदन देण्यात आले ज्ञान मंदिर समिती देवळाली कॅम्प यांच्या वतीने मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

ज्ञान मंदिर कमिटी विश्वनाथ तात्या काळे, किल्ले बोराडे, सजन काळे, अविनाश गायकवाड, संजय भालेराव, भीमरावजी धीवर, पंडित कटारे, अरुण निकम, दिनेश कटारे, विश्वनाथ पोपटकर, नितीन साळवे, लखन डांगळे, कृष्णा लोखंडे, राजू यशवंते, त्र्यंबक के जगताप, किशोर पी पवार, निवृत्ती गांगुर्डे, सुनील भालेराव, गोरखनाथ भोसले, अभिजीत गजरे, राहुल जाधव, मिलिंद दोंदे, वीरेंद्र जाधव, विनोद जगताप, मनोहर अहिरे सुमित भालेराव, राजेश भालेराव, रमेश जगताप, अशोक सदावर्ते, राज चिकणे, श्याम पवार, शशिकांत गायकवाड, सत्यभामा राव, शीला साळवे, प्रति बचके, मनीषा गायकवाड, कमल जगताप, रेखा अहिरे, सुनिता अहिरे, करुणा जाधव, शोभा भडांगे, शकुंतला गायकवाड व माया येसनकर आधी पुरुष व महिला कार्यकर्ते बौद्ध धर्म अनुयायी यांनी पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून हातात फलक घेऊन घोषणाबाजी करीत पंचशील पटागळी घालून बौद्धमय आभाळ वृद्ध महिला अनुयायी यांनी मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सामील झाले होते हा मोर्चा शांतमय वातावरणात बुद्धाच्या विचारावर चालणारा होता ह्या विराट मोर्चाला कुठलेही गालबोट लागलेले नाही