महावीर इंटरनॅशनल तर्फ सुकन्याअवॉर्ड समारोह उत्साहात साजरा

नाशिक प्रतिनिधी/ डॉ. शाम जाधव
आज.दि. ९ मार्च २०२५ रविवार रोजी जागतिक महिला दिन निमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी महावीर इंटरनॅशनल चे अध्यक्ष मा श्री अनिलजी नाहर, कार्याध्यक्षा डॉ संगीताजी बाफना, कार्यक्रम संयोजक आशीष भंसाली, सेक्रेटरी जवारीलाल घिया, महिला प्रमुख विद्युलता तातेड
व त्यांच्या कोअर कमिटी ने आयोजन करून विविध क्षेत्रातील शेकडो महिलांना ‘सुकन्या अवॉर्ड’ देहून सन्मानित करण्यात आले.
राजस्तरीय पुरस्कार पूना धुलिया मालेगांव चांदवड नागपुर येथून पुरस्कर्ता आले होते
हा भव्यदिव्य कार्यक्रम नाशिक येथे औरंगबदकर हॉल, ना. सा. वाचनालय जवळ नेहरू गार्डन येथे पार पडला.
यावेळी कार्यक्रम चे प्रमुख पाहुणे मा. नमिता कोहक ( मिसेस ग्लोबल यूनाइटेड ) मा. नलिनी कड (योगा व सायकलिस्ट ) तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुरस्कार्थी महिलांना मौल्यवान असे मार्गदर्शन ही लाभले. मा नमिता कोहक मॅडम यांनी स्त्री शक्ती चे महत्व व समजा च्या विकासा मध्ये महिलांचा कसा सहभाग आहे तसेच महिलांमध्ये जिद्द आणि चिकाटी असेल तर ती अनेक असाध्य कार्य ही साध्य कसे करू शकते याबद्दल महिलांना प्रबोधन केले.
त्याचप्रमाणे मा. नलिनी कड मॅडम ने त्यांनी केलेल्या नाशिक ते आयोध्या सायकल प्रवास बद्दल व आलेले सकारात्मक अनुभव सर्वाना सांगितले. व एक महिला ठरवले तर काय काय करू शकते या बद्दल मार्गदर्शन केले.
आलेल्या सर्वमहिला पुरस्कार्थी या त्यांच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून स्वतःचे व कुटुंबाचे व समाजाचे नाव उंच करीत आहे. सर्वांनी महावीर इंटरनॅशनल डॉ. श्री अनिलजी नाहर यांचे प्रति आभार व्यक्त केले.कार्यक्रम चे सूत्रसंचालन किरण संचेती, पल्लवी कटारिया, सरला संचेती, यांनी केले. व आभार महिला प्रमुख सोनल दगडे यांनी मानले.