सामाजिक

पठार भागातील सामाजिक कार्यकर्ते -बाळासाहेब ढोले

सामाजिक कार्याची आवड व नेहमीच सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जाणारे संगमनेर तालुक्याच्या पठारभागातीलआंबीखालसा गावचे सरपंच,साधी राहणी उच्च विचारसरणी असलेले व्यक्तिमत्त्व बाळासाहेब ढोले यांनी सामाजिक, राजकीय शैक्षणिक क्षेत्रात आपल्या
कर्तृत्ववान कार्याचा पठारभागातचांगलाच ठसा उमटविला आहे. त्यामुळेच पठारभागात त्यांचे आदराने नाव घेतले जाते. त्यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या कार्याचा घेतलेला आढावा.

आंबीखालसा येथील स्वर्गीय निवृत्ती भाऊ ढोले यांचे गावच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत मोठे काम होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री मधुकर पिचड यांचे ते एकनिष्ठ कार्यकर्ते होते. त्यांच्या माध्यमातून त्यांनी गावात विविध विकासकामे केली. मुळा खोऱ्यातीललाभधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणीमिळावे म्हणून कायमच माजी मंत्री मधुकरपिचड यांच्याकडे पाठपुरावा केला. परिणामतःआज शेती बारमाही झाली आहे. दरम्यानच्या काळात त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांचा मुलगा बाळासाहेब ढोले यांनी वडीलांचा वारसा पुढे चालवला. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून तेही राजकारणात सक्रीय झाले. उत्तम संघटन कौशल्य, मितभाषी, संयमी स्वभावअसल्याने हळूहळू मित्रपरिवार व ज्येष्ठांच्या
साथीने त्यांनी गावात कामे सुरू केली. बघता
बघता ते आज आदर्श सरपंच म्हणून संपूर्ण तालुक्यात सुरपरिचित झाले आहे.

बाळासाहेब ढोले हे जेव्हापासून राजकारणात सक्रीय झाले आहे तेव्हापासून त्यांनी गावच्या सामाजिक,
राजकीय, शैक्षणिक आदी क्षेत्रांत झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. त्याचाच परिपाक म्हणून त्यांचा प्रत्येक कामात मोलाचा वाटा राहिला असल्याने सर्वदूर त्यांची ख्याती पोहोचली आहे.पठारभागात कुठलाही सामाजिक,धार्मिक कार्यक्रम असो त्याठिकाणी ढोले हे सहखुशीने देणगी देतात, त्यामुळे धार्मिक कार्यक्रमासाठी त्यांचा चांगलाच पुढाकार असतो हे वारंवार अधोरेखित होते. याचबरोबर शिवगर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातूनरक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर आदी सामाजिक उपक्रम ते राबवतअसतात. ही सर्व कामे करत असताना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून
पठारभागातील गरजू शालेय मुलांना शैक्षणिक
मदत करणे, तसेच तरुणांना रोजगारउपलब्ध करून देणे ही सर्व कामे ते आजही करतात. गेल्या दहा वर्षांपासून त्यांचे हे सामाजिक काम आजही अविरतपणे सुरू आहे. त्याचबरोबर गावात महिला बचतगट स्थापन व्हावे यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. याचा फायदा होऊन अनेक महिलांना पैशांची बचत करण्यासह उत्पन्नाचे साधन मिळाले. यामुळेच आज आंबीखालसा गावात मोठ्या संख्येने बचतगटांचे जाळे निर्माण झाले असून यांना व्यवसाय करण्यासाठीही पैसे उपलब्धझाले आहे. ग्रामपंचायतीच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सर्वप्रथम ढोले यांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून प्रभाकरराव भोर विद्यालय डिजिटल केले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गुणवत्ता सुधारण्यास मदत झाली आहे. गावच्या विकासाठी नेहमीच त्यांची तळमळ असती
हे अनेक कामांवरुन समोर येत असते. हे सर्व करीत असताना सुनीलशेठ, गंगारामशे व सुभाषशेठ या सर्व भावांची खंबीर साथ मिळते. तसेच पुतण्या कैलासशेठ आणि विक्रमशेठ यांचे योग्य नियोजन असल्यामुळेच
मला ही सर्व कामे करता येत असल्याची
भावना ते प्रगट करतात. भविष्यातही गावच्या
विकासाठी सदैव लोकोपयोगी कामे करत राहणार असल्याचा निर्धार वाढदिवसानिमित्ताने व्यक्त केला आहे. त्यांच्या पुढील दैदीप्यमान वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

असंख्य खवय्यांनाआपल्या चवीची गोडी लावणारे संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील ढोले कुटुंब हे संगमनेरच नव्हे तर राज्यात सुपरिचित झालेआहे. याबरोबरच अनेकांशी त्यांचा स्नेह जुळल्याने घट्ट मैत्रीची वीणही केली आहे. या हॉटेल व्यवसायातील बाळासाहेब ढोले यांच्यासहकुटुंबाने आपल्या कर्तृत्वातून हॉटेल व्यवसायात पक्का पाय रोवला आहे.

.ढोले नाव घेतले की पहिल्यांदा हॉटेलवाले ढोले का? अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया अनेकांच्या तोंडातून आपसूकच येते. यास कारणही तसेच आहे.हॉटेल व्यवसायातून अनेकांच्या पोटाची भूक भागविण्याबरोबर चविष्ट पदार्थांची गोडी लावलेली आहे. त्यामुळे ढोले कुटुंबाचे हॉटेल व्यवसायातील दबदबा अधोरेखित होतो. या संपूर्ण व्यवसायाची कुटुंबासह धुरा सांभाळणारे आणि आदराने
घेतले जाणारे नाव म्हणजे बाळासाहेब ढोले होय. एका खाणावळीपासून सुरू झालेला प्रवास आज पंचतारांकित हॉटेलपर्यंत येऊन ठेपला आहे. संगमनेरातच नव्हे तर जिल्ह्यातील नामवंत हॉटेल म्हणून संगमनेरातील द ग्रेप्स गार्डन, श्री स्वामी समर्थ, सेलिब्रेशन आणि आळेफाटा येथील द ग्रेप्स गार्डनची ओळख
आहे. ही यशस्विता साधण्यासाठी ढोले कुटुंबाचे अपार कष्ट, संयम, चिकाटी, प्रामाणिकपणा महत्त्वपूर्ण ठरले आहेत. विशेष म्हणजे एकत्र कुटुंब पद्धती असल्याने प्रगतीचे टप्पे सहज पार करता आले आहे कुटुंबातील प्रत्येक सदस्य अगदी झपाटल्यागत काम करत असतो. यातीलच बाळासाहेब ढोले हे देखील आहे. व्यवसायाभिमुखताच नव्हे तर मैत्री कशी जपावी याचा उत्तम नमुना देखील आहे. सुख-दुः खात नेहमी साथ देणारा खरा मित्र म्हणून त्यांचा गौरव करतायेईल.त्याचबरोबर कोणाचाहीकधीही द्वेष, मत्सर न करता कठीण प्रसंगात धावून जाणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.मनात कोणाविषयी कोणत्याही कारणावरुन कपट नसणारा अजातशत्रू म्हणून ते लोकांच्या मनात रुजले आहे. सध्या सगळीकडे विभक्त
कुटुंबे पाहायला मिळतात.परंतु, आजही ढोले कुटुंब एका वटवृक्षाप्रमाणे एकत्रच आहे यामुळे कुटुंबाला प्रगतीची वाट अत्यंत सोपी झाली. कुटुंबाला प्रगतीच्या वाटेवर
नेताना आपल्या गावालाही यात सामावून घेण्यासाठी त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्याते आंबीखालसा गावाचे सरपंच पद भूषवत असून, गावाला नव्या विकासाच्या दिशेने नेण्यासाठी सदोदित प्रयत्न करत आहे. समोरच्याला दिलेला शब्द प्रत्यक्ष सत्यात उतरविणे ही त्यांच्या कामाची खासियत आहे. जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाचा पिच्छा सोडायचाच नाही, हे देखील त्यांच्या कामाचे वेगळे वैशिष्ट्य राहिलं आहे.
समाजकारण आणि राजकारण सांभाळण्याबरोबर ते उत्तम शेती देखील करत आहे. यामुळे अनेक तरुणांसाठी ते आदर्श ठरत आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त उदंड
आणि निरोगी आयुष्याच्या खूपखूप शुभेच्छा..!

गणेश लेंडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button