भिसे वस्ती येथे महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी
शेवगाव तालुकतातील दही गावने येथे ज्ञानदेव भिसे, भिसे वस्ती, जुना चांदगाव रोड, येथे मंगळवार दि १/३/२०२२ रोजी महाशिवरात्री सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे
सच्चिदानंद श्रीपाद बाबा व परदेशी बाबा यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प. सद्गुरु महादेव महाराज धाडगे यांच्या कृपेने व मार्गदर्शनाखाली तसेच सर्व साधक भाविक भक्तांच्या सहकार्यातून भव्य एक दिवसीय वैष्णव मेळावा अर्थात महाशिवरात्रि सोहळा संपन्न होत आहे यामध्ये मिरवणूक धर्मध्वज पूजन महाद्वार उद्घाटन व्यासपिठ पूजन इत्यादी तसेच उद्घाटनपर प्रवचन ह.भ.प. अशोक महाराज बोरुडे यांचे होईल नंतर महाप्रसाद होईल तसेच दुपारी ह.भ.प. मीराताई महाराज चौगुले व नंतर जया ताई महाराज उदे यांचे प्रवचन होईल. नंतर चहापाणी व हरिपाठ होईल. सायंकाळी ह.भ.प. सद्गुरु महादेव महाराज धाडगे यांचे सुश्राव्य हरिकीर्तन होईल. नंतर पसायदान व लगेच महाप्रसाद होईल. तरी या आनंद सोहळ्याचा सर्व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी लाभ घ्याअसे आवाहन: नामसाधना अध्यात्मिक सेवा मंडळ,
न. चिंचोली, ता.- नेवासा. व दही गावने ग्रामस्थांनी केले आहे