कान्हुर पठार मध्ये शिक्षकाने केला विद्यार्थीनीचा विनयभंग , शाळा व गावबंद

दत्ता ठुबे
पारनेर – रयत शिक्षण संस्थेच्या कान्हुर पठार येथील जनता विद्या मंदीर या शाळेत शिक्षक साहेबराव जऱ्हाड याने ९ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी शी लगट करत अश्लिल चाळे करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने संबंधीत पिडीत मुलीच्या आजोबाने पारनेर पोलीस स्थानकात धाव घेत फिर्याद दाखल केल्याने पारनेर तालुक्यातील संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
कर्मवीर भाऊराव पाटलांनी खेडेगावातील मुलांना दर्जेदार शिक्षण तेही खेडेगावातच मिळावे , म्हणून लोकांच्या सहभागातून रयत शिक्षण संस्थेच्या शाळा सुरू करून खेडेगावातील मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी अनुभवी , हुशार व उच्चशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थी घडविण्याचे काम सुरू केले . पण नेमके याच गोष्टीला ते ही भ्रष्टाचार विरोधी चळवळीच्या माध्यमातून देशाला दिशा देणाऱ्या अण्णा हजारेंच्या पारनेर तालुक्यातील कान्हुर पठार येथे साहेबराव जऱ्हाड या गुरुने शिष्य असलेल्या विद्यार्थीनी शी लगट करत आश्लिल चाळे करत विनय भंग करून लज्जास्पद वर्तन केले व जीवे मारण्याची धमकी दिली , सदरची बाब मुलीने घरी आल्यावर आजोबाने पारनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला , पोलीसांनी पारनेर न्यायालया समोर भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ कलम ७४ , ७५ ( १ ) , ७८ , ३५२ (२) , बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ व १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधीत शिक्षक साहेबराव जऱ्हाड याला रविवारी पारनेर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे .
या घटनेच्या निषेधार्थ कान्हुर गाव व शाळा काल मंगळवार दि . १८ रोजी दिवसभर ग्रामस्थांनी बंद ठेवून आरोपी व त्याला मदत करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली असून पारनेर पोलीसांनी कान्हुर पठार मध्ये बंदोबस्त ठेवल्याने वातावरण शांत पण पूर्ण होते .
९ वी च्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन विद्यार्थींनीच्या बाबतीत हा प्रकार घडल्याने पारनेर तालुक्यातील शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे .पोलीस निरीक्षक समीर बारवकर व त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विकृत शिक्षक साहेबराव जर्हाड याला बेड्या ठोकल्या. त्याच्यावर पोक्सोसह अन्य कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असल्याचे श्री. बारवकर यांनी सांगितले.
कान्हूरपठार परिसरातील एका छोट्या खेड्यातील पीडित मुलीच्या आजोबांनी पारनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केल्यावर या प्रकाराचे गांभिर्य लक्षात आले . पिडिताची बहीण पारनेर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे . तर पिडिता १० वी ची परीक्षा देत आहे . पण सदरची बाब पारनेर पोलीसांपर्यंत नेली म्हणून आरोपी जऱ्हाड याने या दोघींना ही जीवे मारण्याची धमकी दिली .
जून २०२४ मध्ये दोन ते तीन वेळेस दुपाराच्या दोन वाजण्याच्या सुमाराला चौकात बोलावून घेऊन बळजबरीने त्यांच्या मोटारसायकलवर बसवून पुन्हा आडसाईडला घेऊन पुन्हा बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तू मला कॉल का करत नाहीस असे हा विकृत पीडितेला म्हणायचा. त्यावर मला त्रास देऊ नका असे पीडिता त्याला म्हणत होती. मात्र, त्या विकृताने पीडितेला वारंवार त्रास देणे चालूच ठेवल्याने तिने ही हकीकत घरी सांगितली आणि घरच्यांनी थेेट पोलीस ठाणे गाठले.
पारनेर पोलिसांनी पीडितेच्या आजोबांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आणि न्यायालयासमोर पीडिताने दिलेेल्या भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ७४, ७५ (१)(१), ७८, ३५२ (२), बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ मधील कलम ८ आणि १२ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणातील गांभिर्य ओळखले व पोलिसांतही या वर गुन्हा दाखल झाल्याचे समोर येताच रयतचे सहायक अधिकारी तोरणे यांनी कान्हुर पठारच्या जनता विद्या मंदीर शाळेला भेट दिली असता पालक व ग्रामस्थ यांनी तक्रारींचा पाऊस पाडला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टचार आंदोलनाच्या माध्यमातून पारनेरचे नाव जागतिक पातळीवर नेण्याचे काम केल पण कान्हुर पठार येथील या प्रकरणाला राजकीय धागेदोरे तर नाही ना ? नुकताच सरपंच व उपसरपंच पदावरील व्यक्तींचा वाद तर सर्वांनी पाहिला आहेच. कान्हुर पठार मध्ये सध्या अनेक वादग्रस्त घटना घडत असल्याने कान्हुर पठारचे नाव तालुक्यातच नव्हे , तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या नकाशावर ठळकपणे समोर आले आहे.