इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १९/०३/२०२५

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फल्गुन २८ शके १९४६
दिनांक :- १९/०३/२०२५,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:३५,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:३९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- उत्तरायण
ऋतु :- वसंतऋतु
मास :- फाल्गुण
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- पंचमी समाप्ति २४:३८,
नक्षत्र :- विशाखा समाप्ति २०:५०,
योग :- हर्षण समाप्ति १७:३८,
करण :- कौलव समाप्ति ११:२५,
चंद्र राशि :- तुला,(१४:०७नं. वृश्चिक),
रविराशि – नक्षत्र :- मीन – उ. भा.,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मीन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नहीत,
शुभाशुभ दिवस:- विशाखा वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी १२:३७ ते ०२:०७ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०६:३५ ते ०८:०६ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०८:०६ ते ०९:३६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी ११:०७ ते १२:३७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:०८ ते ०६:३९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
रंगपंचमी, शुक्र पश्चिम लोप, अमृत २०:५० नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- फाल्गुन २७ शके १९४६
दिनांक = १९/०२/२०२५
वार = सौम्यवासरे(बुधवार)

मेष
कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. बोलतांना वाणीत गोडवा ठेवाल. गायक लोकांचे कौतुक केले जाईल. झोपेचे तक्रार जाणवेल. चटपटीत पदार्थ चाखाल.

वृषभ
सर्वजण तुमच्याकडे आकर्षित होतील. तुमची वागणूक प्रेमळपणाची असेल. आल्या-गेल्याचे उत्तम स्वागत कराल. गोड बोलून कार्यभाग साधता येईल. प्रलोभनाला बळी पडू नका.

मिथुन
चैनीच्या वस्तूंवरील खर्च वाढेल. जोडीदाराच्या सौख्यात रममाण व्हाल. स्पष्टपणे बोलणे टाळावे. फसवणुकीपासून सावध सहा. मानसिक चंचलता जाणवेल.

कर्क
मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यापारी वर्गाला चांगला धनलाभ होईल. मुलांच्या कला गुणांचे कौतुक कराल. हौस मौज पूर्ण करून घ्याल. स्त्रियांच्या सहवासात वावराल.

सिंह
कामे मनाजोगी पार पडतील. मुलांच्या प्रगतीचे कौतुक कराल. जोडीदाराबरोबर मनमोकळी चर्चा कराल. काही कामे अकारण खोळंबतील. वात-विकाराचा त्रास जाणवेल.

कन्या
परोपकाराचे महत्व समजून घ्याल. धार्मिक कामांत हातभार लावाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. सर्वांना सहृदयतेने मदत कराल. नातेवाईकांशी विसंवाद टाळावा.

तूळ
कामातून समाधान शोधाल. आरोग्यात सुधारणा होईल. जवळच्या नातेवाईकांची नाराजी दूर करावी. प्रवासात काहीसा त्रास संभवतो. कौटुंबिक प्रश्न जाणून घ्यावेत.

वृश्चिक
गप्पा मारण्यात अधिक वेळ घालवाल. मित्रा मंडळींचा गोतावळा जमा कराल. उत्तम गृह सौख्य लाभेल. पत्नीचे विचार आग्रही वाटू शकतात. प्रेमप्रकरणात जवळीक वाढेल.

धनू
नोकर-चाकरांचे सौख्य मिळेल. भावंडांची मदत घेता येईल. तुमच्या बोलण्याचा चांगला प्रभाव पडेल. बौद्धिक चलाखी दाखवाल. आपल्या काही गोष्टींचे परिक्षण करावे.

मकर
व्यावहारिक बुद्धिमत्ता वापरावी. काही गोष्टींचा सारासार विचार करावा. फार खोलात जाऊन अर्थ काढू नयेत. हातात नवीन अधिकार येतील. तुमच्यातील आत्मविश्वास वाढेल.

कुंभ
अभ्यासू वृत्तीने गोष्टी समजून घ्याल. तुमचा अंदाज बरोबर ठरेल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. सामुदायिक भानगडीत लक्ष घालू नका. नसत्या वादविवादात अडकू नका.

मीन
मित्रांशी मतभेद संभवतात. दिवसभर कामात व्यग्र राहाल. कानाच्या विकारांवर वेळीच उपाय करावेत. कष्टाला मागे पुढे पाहू नका. फसव्या लोकांपासून दूर राहावे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापू

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button