अमृतवाहिनीच्या स्वामी महाले ची आय टी कंपनीत 10 लाख पॅकेज वर निवड!

संगमनेर (प्रतिनिधी)–
विद्यार्थ्यांच्या उच्च गुणवत्तेबरोबर चांगला निकाल आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी काम करणाऱ्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाने लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी करार केला आहे. अमृतवाहिनीच्या आयटी विभागातील स्वामी सुनील महाले यांची टेनेरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये दहा लाखांच्या पॅकेजवर निवड झाली आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये स्वामी सुनील महाले यांच्या निवडीबद्दल संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, डॉ नितीन भांड, प्लेसमेंट विभागाचे प्रवीण वाकचौरे, सौ. उज्वला सुनील महाले ,नामदेव गायकवाड, नामदेव कहांडळ आदी उपस्थित होते.
अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आयटी विभागातील स्वामी महाले याची पुणे येथील ते टेनेरिटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर या पदावर दहा लाखांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली आहे. स्वामी महाले हा सुनील महाले यांचा चिरंजीव असून सुनील महाले व सौ उज्वला महाले यांनी अत्यंत कष्टातून स्वामी याचे शिक्षण पूर्ण केले आहे. सातत्याने इतरांना मदत करणारा हा परिवार असून प्रामाणिकपणामुळे त्यांचा परिसरात नावलौकिक आहे. स्वामी यांनी आयटी विभागातून चांगले मार्क्स मिळून सॉफ्टवेअर कोर्स करत या कंपनीमध्ये दहा लाख पॅकेज वर नोकरी मिळवली आहे.
यावेळी बोलताना सौ शरयू ताई देशमुख म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता जपताना संस्थेने विविध कंपन्यांशी केलेल्या समन्वय करारामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्या आहेत. अनेक विद्यार्थी देशात व परदेशात चांगल्या पदावर व चांगल्या पॅकेजवर काम करत आहे. सध्या आयटी व ए आयचे युग असल्याने या क्षेत्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांना नोकरीच्या जास्त संधी आहेत. तरीही चांगल्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांना चांगल्या कंपन्यांमध्ये चांगल्या पॅकेजवर नोकऱ्या मिळत आहेत. स्वामी महाले ची निवड ही संस्थेसाठी अभिमानास्पद असल्याचे त्या म्हणाल्या.
स्वामी महाले यांच्या निवडीबद्दल माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कार्यकारी विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ एम ए वेंकटेश, डॉ.जे बी गुरव, विभाग प्रमुख डॉ बायसा गुंजाळ, यांच्यासह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.
अमृतवाहिनीमुळे मोठे यश
विद्यार्थी दशेमध्येच विविध कंपन्यांच्या इंटरव्यू देण्याचा अनुभव संस्थेमध्ये आला. येणाऱ्या काळासाठी नवीन कोर्सच्या बाबत संस्थेतील शिक्षक व विभाग प्रमुखांनी सातत्याने मार्गदर्शन केले. आई-वडिलांचे कष्ट, प्रामाणिकपणाची शिकवण आपल्यासाठी महत्त्वाची आहे . आपल्या जीवनामध्ये मिळालेले यश हे अमृतवाहिनी शिक्षण संस्थेमुळे मिळाले असल्याचे अभियंता स्वामी महाले यांनी म्हटले आहे.