रांधे येथे दि.२७ पासून भव्य अखंड श्री स्वामी कथेचे आयोजन

ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांच्या शुश्राव्य वाणीतून कथेचे आयोजन
पारनेर – श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्ताने रांधे येथील माळवाडी मध्ये श्री क्षेत्र पैठण येथील प्रसिद्ध ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांच्या सुश्राव्य वाणीतून गुरुवार दि.२७ ते सोमवार दि.३१ रोजी अखंड श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेचे प्रवचन आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती श्री स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अनिलराव आवारी यांनी दिली .
गुरुवार दि.२७ ते सोमवार दि . ३१ पर्यंत दररोज सायंकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत जन कल्याण व विश्वशांती साठी रांधे येथील माळवाडी च्या श्री स्वामी समर्थ देवस्थान च्या विद्यमाने थोर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री क्षेत्र पैठण येथील ज्ञानमार्तंड हभप नारायण महाराज काळे यांच्या सुश्राव्य वाणीतून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेची प्रवचन सेवा आयोजीत करण्यात आली असून गुरुवार दि . २७ ते शनिवार दि.२९ पर्यंत बाभुळवाडेचे श्री केदारेश्वर प्रासादिक भजनी मंडळ , रांधेचे श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ , दरोडी चे हनुमान प्रासादिक भजनी मंडळ यांचा सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम होणार आहे तर रविवार दि . ३० रोजी वडझिरे येथील विठ्ठल रुक्मिणी पायी दिंडी सोहळा आयोजीत करण्यात आला असून गजानन , हनुमान , श्रीराम , भैरवनाथ , संगमेश्वर , सिध्देश्वर , विठ्ठल , चोंभेश्वर , खोडदेबाबा , रेणुकामाता प्रासादिक भजनी मंडळांचा भजन सेवेचा कार्यक्रम संपन्न होणार आहे . अखेरच्या टप्प्यात सोमवार दि . ३१ रोजी सकाळी ७ . ३० ते दुपारी १२ . ३० वाजता यज्ञ व प्राणप्रतिष्ठा विधी व सायंकाळी ५ ते रात्री ८ . १५ वाजता रांधे येथील ग्रामदैवत रांधु आई , प्रति पंढरपूर असलेले विठ्ठल रुक्मिणी , चारंग बाबा , भैरवनाथ , हनुमान महाराज , श्री गुरुदेव दत्त , श्री खंडोबा या देवांच्या व श्री स्वामी समर्थ महाराजांच्या भेटी व भव्य पालखी मिरवणूक आणि वितरण सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.
रात्री ९ . ३० ते ११ वाजेपर्यंत थोर उदार व दानशूर अन्नदाते यांच्या लोकसहभागातून अन्नदान महाप्रसाद करण्यात येणार असून रात्रीच्या वेळी फटाक्यांची आतिषबाजी आयोजीत करण्यात येणार आहे , तर भव्य सोडत योजनेव्दारे ई बाईक , फ्रिज , एल ई डी टि व्ही , वॉटर फिल्टर हे बक्षीसे भाग्यवान भाविक भक्तांना देण्यात येणार आहे , तरी धर्मानुरागी परमार्थ प्रेमी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आबालवृद्ध महिला व पुरुषांनी भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने व श्रद्धेने या अखंड श्री स्वामी समर्थ महाराजां ची कथा प्रवचन श्रवण करण्यासाठी व तद्नंतरच्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा,असे आवाहनही श्री स्वामी समर्थ देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
पारनेर तालुक्याच्या इतिहासात प्रथमच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कथेचे प्रवचन आयोजीत करण्यात आले आहे . यातून श्री स्वामी समर्थ महाराजांचे जीवन चरित्र प्रवचनाच्या माध्यमातून उलगडून सांगण्यात येणार असून त्यातून श्री स्वामी समर्थ महाराजांची महती कळणार आहे .