इतर
राष्ट्रवादी असंघटिक कामगार विभागाच्या संघटक सचिव पदी कांचन शिरभे यांची नियुक्ती…..

जालना दि 24 – तालुक्यातील मानेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां कांचन राजु शिरभे यांची राष्ट्रवादी असंघटिक कामगार विभागाच्या प्रदेश संघटक सचिव पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयात प्रदेशाध्यक्ष मनोज व्यवहारे व प्रेदेश सरचिटणीस रमेश दिनकर, राष्ट्रवादी जालना जिल्हाधिकारी अध्यक्ष अरविंदराव चव्हाण यांच्या मान्यतेने ही नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी चे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.