अकोल्यात माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने फुलोकी होली कार्यक्रम उत्साहात संपन्न

अकोले /प्रतिनिधी
येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या वतीने होली निमीत्त फुलोकी होली कार्यक्रम माहेश्वरी समाजाच्या जाजू मंगल कार्यालयात उत्साहात संपन्न झाला. महासभेच्या त्रिवेणी संगम अंतर्गत महिला संगठन ने तालुका संगठन व युवा संगठन ला यामध्ये समाविष्ट केल्यामुळे कार्यक्रमाची रंगत विशेष वाढली.
सर्व उपस्थितातंचे तिलक करून गुलाबपुष्पाने स्वागत करण्यात आले. आरंभी महेश पूजन व राधा कृष्ण यांच्या जीवनावर आधारीत नृत्याने कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सादर करण्यात आलेल्या नृत्यामध्ये सौ.रश्मी साकी (कृष्ण), सौ.प्रेरणा वर्मा (राधा) यांच्या समवेत सौ.तृप्ती सारडा, सौ.प्रियंका बुब, सौ.जयश्री मुंदडा, सौ.ज्योती सारडा, सौ.ज्योती जाजू ह्या सहभागी झाल्या होत्या.
उपस्थितांनी होळी गित व भजन सादर केले यामध्ये सौ.तृप्ती सारडा, सौ.प्रियंका बुब, सौ.जयश्री मुंदडा, सौ.ज्योती सारडा, सौ.ज्योती जाजू, प्रा.डॉ.गोपाल बुब, निरज मुंदडा, अॅड. योगेश मुंदडा, शुभम मणियार, सर्वेश डांगरा सहभागी झाले होते. पुष्प वृष्टी, भजन, होली गित, सोबतच दांडियाचा देखील सर्वांनी आनंद घेतला. कार्यक्रमप्रसंगी महिला संगठनच्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांनी ङ्गराजस्थानी पगडीफफ धारण केली होती.

अकोले तालुका माहेश्वरी सभेचे अध्यक्ष विजय सारडा यांनी महिला संगठन च्या नवनिर्वाचित पदाधिकार्यांद्वारे आयोजीत पहिल्याच कार्यक्रमाची विशेष प्रशंसा केली. नई संकल्पना, नये विचार या अंतर्गत महिला संगठन च्या नवनिर्वाचीत पदाधिकार्यांनी ज्येष्ठ महिलांच्या निवासस्थानी जावुन त्यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले व त्या देखील उत्साहाने कार्यक्रमात सहभागी झाल्या याबद्दल ज्येष्ठ महिलांसह नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे विशेष आभार मानले. यावेळी विजय सारडा म्हणाले कि सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विरंगुळा म्हणून अशाच विविध कार्यक्रमाचे आयोजन महिला संगठन वर्षभर करावे. त्यात सर्व समाज बंधु-भगिनींना सहभागी करून घ्यावे. त्यामुळे संगठन भक्कम होण्यास देखील मदत होईल. नवनिर्वाचीत पदाधिकार्यांना गुलाबपुष्प देवुन सन्मानित करण्यात आले. आम्ही जास्तीत जास्त चांगले कार्यक्रम घेऊन अकोल्याचा नावलौकीक जिल्हा व राज्य पातळीवर करू असे आश्वासन नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.प्रियंका बुब यांनी दिले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी निरज मुंदडा, सौ.सुनिता राठी, अल्पेश सारडा, सौ.मिना बुब, श्रीमती किरण मणियार तसेच महिला संगठनच्या पदाधिकारी अध्यक्षा सौ.प्रियंका बुब, सेक्रेटरी सौ.तृप्ती सारडा, उपाध्यक्ष सौ.जयश्री मुंदडा, कोषाध्यक्ष सौ.ज्योती सारडा, सह-सेक्रेटरी सौ.प्रेरणा वर्मा, प्रसिद्धी प्रमुख सौ.ज्योती जाजू आदिंनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.तृप्ती सारडा व सौ.प्रियंका बुब यांनी करून उपस्थितांचे आभार मानले.