इतर

नेप्ती फाटा रस्त्याचे डांबरीकरण अखेर सुरु!

नेप्तीतील प्रलंबित कामे पूर्ण करणार: – एकनाथ जपकर

अहिल्यानगर :नगर तालुक्यातील नेप्ती येथील नेप्ती फाटा ते गाव या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होत होती अखेर या रस्त्याच्या डांबरीकरण कामाचा शुभारंभ माजी सरपंच संजय आसाराम जपकर , संजय अशोक जपकर, उपसरपंच एकनाथ जपकर यांच्या हस्ते करण्यात आला. या मुख्य रस्त्याचे डाबरी करण्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यासाठी खा.निलेश लंके यांनी ७५ लाख रुपये निधी दिला आहे .गेल्या अनेक वर्षापासून या मार्गाची मोठी दुरावस्था झाली होती. हा रस्ता गावाकडे जाण्यासाठी मुख्य मार्ग असल्याने या मार्गावरून मोठी वाहतूक होत होती. हा रस्ता खराब असल्याने लोकांना खूप त्रास सहन करावा लागत होता . या रस्त्यात जागोजागी खड्डे पडले होते. त्यामुळे या रस्त्यावर डांबरीकरण करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून अनेकांकडे करण्यात आली होती पण कोणीही या मागणीचा विचार विचार केला नाही .पण खा.निलेश लंके यांनी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आहे .

जनतेने मोठा विश्वास ठेवून मला उपसरपंच केले आहे .गेल्या अनेक वर्षापासून रखडलेल्या या रस्त्याचे काम माझ्या कार्यकाळात होत आहे याचा मला अभिमान आहे . जनतेच्या मूलभूत गरजा सोडवण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणार आहे. विकास कामे ही करणार आणि जनतेला सन्मानही देणार आहे. जनतेने माझ्यावर मोठा विश्वास टाकला आहे. त्याला थोडाही तडा लागून देणार नाही. जनतेने गावाचा विकास करणाऱ्याच्या मागे उभे राहावे तसेच नेप्तीतील प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करणार असे प्रतिपादन उपसरपंच एकनाथ जपकर यांनी केले आहे.

यावेळी माजी उपसरपंच बाबासाहेब होळकर, समता परिषदचे तालुकाध्यक्ष रामदास फुले, चेअरमन विलास जपकर, अशोक जपकर ,कारभारी जपकर ,ग्रामपंचायत सदस्य फारुख सय्यद, दादू चौगुले, संभाजी गडाख ,उमर सय्यद, अतुल जपकर , माजी सरपंच दिलीप होळकर ,सुधाकर कदम, शिवाजी होळकर, देवा होले ,वसंत पवार, ज्ञानेश्वर जपकर, मल्हारी कांडेकर ,नंदू जाधव, नितीन कदम ,बाळासाहेब बेल्हेकर, नानासाहेब कदम ,मनोहर ठुबे, मोहन ठुबे, ठेकेदार बाळासाहेब पानसंबळ ,अशोक सोनवणे व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button