इतर

संगमनेरात मनोज जरांगे पाटलांच्या विराट सभेची तयारी पूर्ण

संगमनेर :प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे जनक मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या बुधवार दि २२नोव्हेंबर रोजीसंगमनेर येथील जाणता राजा मैदानावर होणाऱ्या विराट सभेसाठी लागणारे स्टेजसह इतर तयारी पूर्ण झाली आहे

तालुक्याच्या चारही बाजूने येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनपार्किंगची ही व्यवस्था सकल मराठा समाजाच्या वतीनेकरण्यात आली आहे
एकच ध्यास मराठा आरक्षण मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या एकमुखी मागणीसाठी मराठायोद्धामनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे मराठा समाजात जन जागृती व्हावी यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण महाराष्ट्राचादौरा सुरू केला आहे

शिवस्मृतिदिनानिमित्ताने पट्टाकिल्ला येथे आयोजित करण्यातआले ल्या कार्यक्रमास उपस्थित राहून जरांगे पाटील हे बुधवारी दुपारी ३वा संगमनेरात दाखल होणार आहे त्यांचे जंगी स्वागत करण्याची तयारी संग मनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलेली आहे


संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागा कडून येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या पार्किंगची व्यवस्था मेडिकेव्हर हॉस्पिटल च्या पश्चिमेस नवले यांचा प्लॉट श्रमिक मंगल कार्यालय शारदा विद्यालय अकोले नाका व इंदिरानगरमधील प्रांत कार्यालयां च्या निवासस्थानासमोरील प्रांगणात केली आहे पूर्वभागाकडून येणाऱ्या समाज बांध वांसाठी ज्ञानमाता विद्यालय पावबाकी रोड सातपुते नगर पोतदार शाळेजवळ आशिष गार्डन तसेच उत्तर भागातून येणा ऱ्या समाजबांधवांसाठी मार्केट यार्ड पटां गण शेतकी संघ पटांगण मालपाणीलॉन्स पटांगण राजेंद्र होंडाचे पाठीमागे महावि तरणचे पटांगण दक्षिण भागातून येणाऱ्या समाज बांधवांसाठी संगमनेर खुर्द येथील शोएब पठाण यांचा प्रवरा सर्विस स्टेशन जवळ मोकळा प्लॉट आणि ज्ञानमाता विद्यालय आशा ४ ही बाजूने येणाऱ्या मराठा समाज बांधवांच्या वाहनांच्या पार्किंगची सकल मराठा समाजाच्या वतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे त्यामुळे सर्व बांधवांनी नेमून दिलेल्या ठिकाणीच आपली वाहने लावावी असे ही आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे तरी या सभेसाठी संगमनेर तालुक्यातील सर्व मराठा समाज बांधवांनी लाखोंच्या मोठ्या संख्येने उप स्थित राहावे असे आवाहन संगमनेर शहर आणि तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button