श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणी अधिकारी 5 हजाराची लाच घेताना सापळ्यात अडकले!

अहिल्यानगर दि 26
अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी विक्री दस्त नोंदणी अधिकारीच लाच सापळ्यात अडकले जमीन खरेदी विक्रीचा दस्त नोंदणीसाठी तक्रारदाराकडून पाच हजार रुपयाची लाच घेताना सचिन पांडुरंग खताळ दुय्यम निबंधक श्रेणी 1 वर्ग 3 हे अँटी करप्शन च्या सापळ्यात अडकले त्यामुळे श्रीगोंदा दुय्यम निबंधक कार्यालयातील भ्रष्टाचा राचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आहे सापळा कारवाई पुढीलप्रमाणे
▶️ युनिट –अहिल्यानगर.
▶️ तक्रारदार- पुरुष,वय- 36 वर्षे
▶️ *आलोसे – सचिन पांडुरंग खताळ, वय – 38 वर्ष, पद – दुय्यम निबंधक श्रेणी 1 वर्ग-3, दुय्यम निबंधक कार्यालय, श्रीगोंदा रा. साईराज अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 101, श्रीगोंदा, ता.श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर
▶️ लाचेची मागणी
तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणून लाचेची मागणी केली.
दिनांक -26/03/2025
▶️ *लाच स्विकारली
5,000/ रुपये
दिनांक -26/03/2025
▶️ *हस्तगत रककम –
5,000/-रुपये
▶️ लाचेचे कारण
तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. तक्रारदार यांनी स्वतः व इतर 27 यांनी श्रीगोंदा येथील गट नंबर 1171 मधील 5 हेक्टर 68 आर क्षेत्रापैकी 28 आर जमीन विकत घेतली होती. त्याचा दस्त दिनांक 28/2/ 2025 रोजी केलेला होता. त्यानंतर आज दि.26/3/2025 रोजी तक्रारदार तसेच त्यांचे पार्टनर यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक 1171 मधील 20 आर क्षेत्रापैकी त्यांचे पार्टनर यांचे अविभाज्य हिस्यlची पूर्ण विक्रीचे 1 आर क्षेत्र दुसऱ्यांना 50,000/- हजार रुपये विक्री केल्याबाबतचा दस्त नोंदविण्याकरता तक्रारदार यांना दुय्यम निबंधक कार्यालयात देण्याकरता त्यांच्याकडे दिला होता. त्यावेळी तक्रारदार यांनी सदर चा दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला. त्यावेळी खताळ यांनी आजच्या दस्ताचे 5000/- रुपये व दिनांक 28/2/2025 रोजी नोंदविलेल्या दस्ताचे 10,000/- रुपये लाच मागणी केल्याबाबतची तक्रार दि.26/03/2025 रोजी ला.प्र.वि. अहिल्यानगर येथे प्राप्त झाली होती. सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगाने दि.26/03/2025 रोजी लाच मागणी पडताळणी करण्यात आली. लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचा समक्ष तक्रारदार यांना तुमच्या दिनांक 28/2/2025 रोजी दस्ताचे पैसे तुमचे पार्टनर देतील तुम्ही आजच्या दस्ताचे तुम्ही तुमच्या हिशोबाने द्या असे म्हणून लाचेची मागणी केली आहे. दि.26/03/2025 रोजी दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ, दुय्यम निबंधक यांनी तक्रारदार यांचे कडून 5,000/- रुपयाची लाच स्वीकारली असता त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांचे विरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाणे, जिल्हा अहिल्यानगर येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
▶️ हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
▶️ *सापळा व तपास अधिकारी
श्री.राजू आल्हाट,
पोलिस निरीक्षक,ला.प्र.वि. अहिल्यानगर. मोबा.नं.9420896263
▶️ *सापळा पर्यवेक्षण अधिकारी*
श्री. अजित त्रिपुटे, पोलीस उप अधीक्षक, ला प्र.वि., अहिल्यानगर, मो. क्र .8329701344
▶️ सापळा पथक पोलीस नाईक चंद्रकांत काळे, पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब कराड, चापोहेकॉ. दशरथ लाड
▶️ *मार्गदर्शक –
मा.श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलीस अधीक्षक , ला.प्र.वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक.
मोबा.नं. 91 93719 57391
▶️ आलोसे यांचे सक्षम अधिकारी मा. नोंदणी महानिरीक्षक, पुणे
सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा. अँन्टी करप्शन ब्युरो, अहिल्यानगर.
@ दुरध्वनी क्रं. 0241-2423677@ टोल फ्रि क्रं. 1064