अमृतवाहिनी तंत्रनिकेतनच्या ११ विद्यार्थ्यांची टेट्रा पॅक इंडिया प्रा. लिमिटेड, पुणे मध्ये निवड.

संगमनेर प्रतिनिधी
अमृतवाहिनी तंत्रनिकेतन संगमनेरच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागामार्फत कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या ११ विद्यार्थ्यांची टेट्रा पॅक इंडिया प्रा. लिमिटेड, पुणे येथे निवड झाली आहे
यात आर्यन नागोडे, सत्यम नवले, आशिष पवार,अजय वैराळ,दिक्षा कानवडे,वेदांत जाधव – सर्व मेकॅनिकल इंजी, तसेच आहेर आदित्य, मयूर मालुंजकर, प्रसाद राहिंज, वैभव शेळके,सार्थक वर्पे -सर्व E&TC इंजी. या विद्यार्थ्यांची 3.40 LPA च्या पॅकेज सह निवड झाली.
विद्यार्थ्यांच्या या निवडीसाठी व ट्रेनिंग प्लेसमेंट प्रमुख प्रा.शेखर सुर्वे, मेकॅनिकल डिपार्टमेंट ट्रेनिंग प्लेसमेंट मेंबर प्रा.एस.एस.गंधे, प्रा.एस.व्ही.देशमुख आणि इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभाग ट्रेनिंग अँड प्लेसमेंट मेंबर प्रा.जी.एल.बोराडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे, संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त मा.शरयु देशमुख, मुख्य कार्यकारी अनिल शिंदे, आणि डायरेक्टर अकॅडमीक डॉ.जे.बी.गुरव प्राचार्य व्ही.बी.धुमाळ यांनी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.