पोल्ट्री व्यवसायावरील ग्रामपंचायत कर कमी न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा पोल्ट्री व्यावसायिकांचा इशारा!

अकोले प्रतिनिधी
पोल्ट्री व्यवसायावर आकारण्यात येणारे ग्रामपंचायत कर कमी करण्याचे करावे अशी मागणी अकोले संगमनेर तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अकोले पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे
याबाबतचे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना दिले शासनाने पोल्ट्री धारकांना ग्रामपंचायत कर आकारणीत सवलत देण्याचा शासन निर्णय घेतला आहे त्याची अंमलबजावणी अकोले तालुक्यात न झाल्यास पोल्ट्री व्यवसायिकांच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे अकोले पोलिसांना ही या बाबत चे निवेदन दिले आहे
पोल्ट्री व्यवसायावर लावलेला ग्रामपंचायत कर कमी करावा याबाबत यापूर्वीही संघटनेने मागील वर्षी निवेदन दिले होते त्यावर कार्यवाही केली नाहीअसा आरोप संघटनेने केला आहे
‘, पोल्ट्री व्यवसायावर ग्रामपंचायत कडून कर आकारणी केली जात आहे . पोल्ट्री व्यवसाय शेती पुरक आहे राज्य शासनाने याबाबत १९९९ ला एक शासन निर्णय जाहीर केला आहे या शासन निर्णयाप्रमाणे कर आकारणी करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे
पोल्ट्री व्यवसाय कृषी पुरक व्यवसाय आहे. यावर ग्रामपंचायत निवासी कर आकारणी करत आहे. हा सरळ सरळ शेतकन्यावर अन्याय आहे. शेतकरी शेतीस जोड व्यवसाय म्हणून आपल्या आर्थीक समृद्धी साठी गोधन, कुक्कुटपालन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उद्योग या सारखे व्यवसायाला सुद्धा ग्रामपंचायत कर आकारणी करत आहे.
ग्रामपंचायत सापोली ता. पेन जिल्हा. रायगड या ग्रामपंचायतने पोल्ट्री शेडवर 0.10 पैसे चौ.फूट. या प्रमाणे आकारणी केलेली असून त्या प्रमाणे अदिवासी डोंगराळ अकोले तालुक्यातील सर्व पोल्ट्री धारकांची वरील प्रमाणे आकरणी करण्यात यावी. अन्यथा आम्ही सर्व पोल्ट्री धारक रस्त्यावर उतरू असा इशारा संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख ,कार्याध्यक्ष बाळासाहेब कानवडे विभाग प्रमुख सुदाम हांडे.अकोले विभाग प्रमुख राहुल नवले श्री शिंगोटे गणेश नवले ,राजुर विभाग प्रमुख तेजस फलके किसन पिचड, कोतुळ विभाग प्रमुख मेजर सचिन घोलप, भाऊसाहेब साबळे , कैलास थटार , संतोष देशमुख, अंभोळ सुरेश साबळे वामन जगताप यांनी दिला आहे
———///—