पारनेर तालुक्यात शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा !

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी :
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री व आपल्या राजकीय पटलावर विविध विकासात्मक भूमिका साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व शरद पवार यांच्या 82 व्या वाढदिवसा निमित्ताने पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले .
सोमवारी सकाळी नारायण गव्हाण येथील पंचक्रोशीतील जागृत देवस्थान असणारे चुंबळेश्वर महादेव मंदिरात पवार साहेबांच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी आमदार लंके यांनी अभिषेक केला तर नंतर पारनेर शहरात पारनेर नगर पंचायत तसेच राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेलच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सुनील जगताप व जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या रक्तदान शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून , समाजासाठी काम करणाऱ्या इतिहास पुरुष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या रक्ताचा सर्वसामान्य गरजू रुग्णांना लाभ होईल ही भावना ठेवून ते रक्तदान शिबिर भरवण्यात आले व त्यालाही उस्फुर्त असा प्रतिसाद मिळाला .
आमदार निलेश लंके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात नगरपंचायतचे नगरअध्यक्ष विजय औटी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकर डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ. बाळासाहेब कावरे यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात पाणीपुरवठा सभापती योगेश मते,आरोग्य सभापती डॉ . विद्या कावरे , आशोकशेठ चेडे , नितीनशेठ अडसुळ , बाळासाहेब नगरे श्रीकांत चौरे , भूषण शेलार , सुभाष शिंदे , डॉ.सचिन औटी, विजय भा.औटी ,राष्ट्रवादी युवाचे जिल्हा उपाध्यक्ष अक्षय चेडे,शहर प्रमुख बंडू गायकवाड , उपप्रमुख रमीज राजे , युवक उपाध्यक्ष दगडू कावरे , शहर महीला उपाध्यक्ष सौ.दिपाली औटी, संदीप चौधरी , ऍड. मंगेश औटी ,ऍड.गणेश कावरे सचिन नगरे , दादा शेटे, अशोक कावरे भगवान तांबे तसेच जनकल्याण रक्तपेढीचे डॉ. वसंतराव झेंडे , डॉ . सोनाली खांडरे , डॉ भुषण पवार , डॉ . श्याम पाटील यांनी उपस्थिती दर्शवून रक्तदाना सारख्या पवित्र कार्यात योगदान दिले .
आमदार निलेश लंके हे विविध उपक्रमाच्या माध्यमातून नेहमी मोठमोठे रक्तदान शिबिरे आयोजित करत असतात या ही वेळी जनकल्याण रक्तकेंद्र नगर विभागीय रक्त संक्रमण केंद्र यांच्या माध्यमातून भव्य असे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले .सदर रक्तदान शिबिरास अनेक मान्यवर मंडळींनी आपली उपस्थिती दर्शवून रक्तदान करत उच्चंकी रक्तदान शिबिर यशस्वी केले .