शनिवारी पारनेर येथे शासनाच्या विविध योजनांपासून वंचीत जनतेसाठी कॅम्पचे आयोजन

दत्ता ठुबे
पारनेर :-शासनाच्या विविध योजनांसाठी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य गरीब जनतेला अडचणींना सामोरे जावे लागत आहे.शासकीय कार्यालयात अनेक वेळा हेलपाटे मारूनही कामे मार्गी लागत नाहीत . यासाठी पारनेर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी पुढाकार घेऊन सर्वांच्या अडचणींची सोडवणूक व विविध योजनांचे लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी पारनेर येथे शनिवार दि 5 ऑक्टोबर रोजी कॅम्पचे आयोजन केले आहे.
त्यात खाली दिलेल्या बाबींसह उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पी एम किसान योजनेचे 6000 पैसे येत नसेल अशा व्यक्तींनी आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड 7/12 ,8 अ उतारा झेरॉक्स, नमो किसान योजनेचे 6000 पैसे येत नसेल अशा व्यक्तींनी आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड 7/12 ,8 अ उतारा झेरॉक्स, लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नाहीतअशांनी आधार कार्ड व बँक पासबुक झेरॉक्स,रेशन कार्ड ऑनलाइन करायचे असेल, धान्य बंद झाले असेल, नाव कमी करायचे असेल, नाव वाढवायचे असेल
अशा लोकांनी रेशन कार्ड मधील सर्वांचे आधार कार्ड झेरॉक्स व रेशन कार्ड झेरॉक्स,मतदान कार्ड नवीन मतदार नोंदणी करण्यासाठी दोन फोटो ,एक आधार कार्ड झेरॉक्स,संजय गांधी निराधार योजनेचे दर महिन्याला 1500 रुपये नवीन चालू करणे, ज्यांचे पैसे बंद झाले, दर महिन्याला पंधराशे रुपये पेक्षा कमी पैसे मिळतात, अशा व्यक्तींनी आधार कार्ड, बँक पासबुक ,रेशन कार्ड झेरॉक्स घेऊन जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले असून जेणेकरून कोणीही वंचीत राहू नये हा उद्देश यामागे असल्याचे सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
सदर कॅम्प आंबेडकर भवन बाजार तळ, पारनेर या ठिकाणी सकाळी 10 वाजता सुरु होईल असे सांगण्यात आले आहे.