ज्ञानेश्वरी समाजाचा गाभा तर नियमावली ही संस्थेचा गाभा आहे- सहाय्यक धर्मादाय उपायुक्त श्रीमती उषा पाटील

दत्ता ठुबे
पारनेर -ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी ही आपल्या समाजाचा गाभा आहे त्याप्रमाणे आपल्या संस्थेची नियमावली ही आपल्या संस्थेचा गाभा आहे असे प्रतिपादन अहिल्यानगरच्या सहाय्यक धर्मादाय उप आयुक्त श्रीमती उषा पाटील यांनी पारनेर येथे विश्वस्ताच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना केले.
सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अहिल्यानगर मा. धर्मादाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचे मार्गदर्शनाखाली
महाराष्ट्र शासन निर्णयास अनुसरून १०० दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत पारनेरमध्ये विश्वस्तांसाठी कार्यशाला आयोजित केली होती.यावेळी प्रमुख मार्गदर्शन म्हणून श्रीमती उषा पाटील यांनी मार्गदर्शन केले.
धर्मादाय आयुक्त कार्यालयाअंतर्गत संस्थांच्या विश्वस्थ मंडळासाठी पारनेर येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते यावेळी मुख्य आयोजक शिवमंदीर सेवाभावी संस्थानचे अध्यक्ष सुनील फापाळे यांनी मान्यवराचे स्वागत केले.

प्रमुख वक्ते म्हणून धर्मादाय उपायुक्त उषा पाटील यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले तसेच सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय अधीक्षक व्ही. पी. सुरकुटला यांनी संस्था नोंदणी व नियमावली यावर मार्गदर्शन केले.निरीक्षक वाय. सी. भागवत यानी यावेळी विश्वास्ताना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच निरीक्षक यु. एम. ढोले यांनी संस्था हिशेब ( आँडीट ) याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शिवमंदीर सेवाभावी संस्थानचे अध्यक्ष श्री. सुनील फापाळे यांनी आभार मानले तर श्री.निवडूंगे सर यांनी सुञ संचालन केले . यावेळी दि अहमदनगर जिल्हा ग्रंथालय संघाचे संस्थापक श्री. सदाशिव शेळके सर,संघाचे जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र शिंदे,विश्वस्थ भाऊसाहेब गवळी,शशिंकात झंजाड, सचिन नगरे, अँड रांजेद्र वाबळे सह तालुक्यातील अनेक संस्थाचे पदाधिकारी विश्वस्थ यावेळी उपस्थित होते.